एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून काँग्रेसचे मोहम्मद आरीफ नसीम खान यांना उमेदवारीची ऑफर

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून काँग्रेसच्या नाराज नेत्याला लोकसभा उमेदवारीची ऑफर देण्यात आली आहे.

काँग्रेसचे नेते मोहम्मद आरीफ नसीम खान हे पक्षावर नाराज असल्याचं समोर आलं आहे. उमेदवारांचा प्रचार करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मोहम्मद आरीफ नसीम खान यांनी यासंदर्भात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना एक पत्रही लिहिलं आहे. त्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेत मनातील खदखद व्यक्त केली आहे.

नसीम खान यांच्या नाराजीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया देताना नसीम खान यांना थेट लोकसभेच्या उमेदवारीची ऑफर दिली आहे. नसीम खान हे नाराज आहेत असं मी ऐकलं आहे. त्यांनी राजीनामा दिला तर मला चांगलं वाटलं, मात्र त्यांनी केवळ पक्षाच्या स्टार प्रचारकाचा राजीनामा दिला आहे. एवढा राग असेल तर थेट पक्षाचा राजीनामा द्यायला हवा. मी तुम्हाला तिकीट द्यायला तयार आहे. आमचे मुंबईचे उमेदवार फिक्स झाले आहेत, मात्र तुम्ही म्हणाल त्या जागेवरून तुम्हाला तिकीट देऊ. नौटंकी करू नका, राजीनामा द्यायचा असेल तर पक्षाचा द्या, निवडणूक लढवा असं जलील यांनी म्हटलं आहे.

You may have missed