Site icon mcnnews.tv

छत्रपती संभाजीनगर : युवकाला चाकू दाखवत लुटणाऱ्या तिघांना अटक

युवकाला चाकू दाखवत लुटणाऱ्या तिघांना अटक

/प्रतिनिधी सुमित दंडुके 

छत्रपती संभाजीनगर : वेदांतनगर पोलिसांनी अवघ्या 12 तासात आरोपींच्या आवळल्या मुसक्याआरोपींकडून मोबाईल आणि 10 हजार रोख जप्त

शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात रात्री 12 वाजेला एका प्रवाश्याला चाकुचा धाक दाखवून लुटणाऱ्या तिघा आरोपींना वेदांतनगर पोलिसांनी अवघ्या 12 तासात अटक केली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी एक मोबाईल आणि 10 हजार रूपये जप्त केले आहेत.जयेश पाटील हे रेल्वेस्टेशनकडून बाबा पेट्रोल पंपकड़े जात असताना दुचाकिवर आलेल्या तिघानी त्याना अडवल आणि चाक़ू दाखवत त्याच्याकडील मोबाईल आणि 10 हजार रूपये घेतले. याची तक्रार त्यांनी वेदांतनगर पोलीस ठाण्यात दाखल करताच पोलिसांनी तपास करत तिघा आरोपींना अटक केली आहे. आनंद भगवान वाघमारे, आदिनाथ गोविंदराव जोगदंड आणि अमोल भगवान डोंगरे असे अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडिल मुद्देमाल जप्त करत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिलीये.

Exit mobile version