छत्रपती संभाजीनगर : भुलथापांना बळी न पडता विकासाला मतदान करा- डॉ जीवन राजपूत

विश्वासाला तडा जाऊ देणार नाही -डाॅ.जीवन राजपूत

 

छत्रपती संभाजीनगर : काही राजकारणी तुम्हाला प्रलोभने दाखवतील, खोट आश्वासन देतील, जाती धर्माच्या नावावर मते मागतील मात्र त्यांच्या भुलथापांना बळी न पडता विकासाला मतदान करा, डॉ .जीवन राजपूत यांना मत म्हणजे विकासाला मत त्यामुळे रिमोटचे बटन दाबून मला विजयी करा असे आवाहन करत तुमच्या विश्वासाला त्याला जाऊ देणार नाही असे आश्वासन अपक्ष उमेदवार डॉक्टर राजपूत यांनी दिले .

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय अपक्ष उमेदवार डॉ जीवन राजपूत यांच्या प्रचारार्थ बायजीपूरा येथे कॉर्नर सभा झाली त्या सभेला वयोवृद्ध महिला, पुरुष,तरुण,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. फटाक्यांच्या आतिषबाजी करून स्वागत करण्यात आले.ंयानंतर सर्व प्रथम उमेदवार डॉ जीवन राजपूत यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी येथील नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढा उमेदवार डॉ जीवन राजपूत यांच्या समोर वाचून दाखवली. या भागात शिक्षणाची सोय नाही, रस्ते, पाणी, ड्रेनेज आदी कोणत्याच मुलभूत सुविधा नाहीत. हा परिसर विकासापासून खूप दूर आहे. या भागात सर्वांगीण विकास, एमपीएससी ,यूपीएससी, चांगले वाचनालय आदी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन डॉक्टर जीवन राजपूत यांनी दिले.

केंद्र सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत , मात्र कमी शिकलेले लोक खासदार म्हणून निवडून जातात पण योजना माहित नसतात म्हणून योजना सर्वसामान्यपणे जात नाही त्यामुळे त्यांना मिळत नाही असे खासदार निवडून देऊ नका, त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका, जातीपातीच्या नावावर मतदान करू नका, खोटी आश्वासने देणाऱ्यांना घरी बसवा आणि विकासाला मतदान करा, एकवीस नंबरचे रिमोट चे बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा,तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे आश्वासन अपक्ष उमेदवार डॉ जीवन राजपूत यांनी दिले.

या काॅर्नर बैठकीला ८५ वर्षाचे वयोवृद्ध फकीरचंद रत्नपारखे उपस्थित होते.यावेळी उमेदवार डॉ जीवन राजपूत यांनी त्यांना वृक्ष भेट देऊन त्याचे स्वागत केले.

You may have missed