जालना लोकसभा .दानवेंचं “कल्याण” होणार का ? | GALLI TE DELHI

 GALLI TE DELHI  : शहराला चांगल्या उद्योगांची पार्श्वभूमी जरी असली तरी शहरासह मतदार संघाला वेगवेगळ्या समस्यांनी विळखा घातलाय. जालना शहरात 12 ते 15 दिवसांनी पाणीपुरवठा होतोय.  कोट्यवधी रुपये खर्चून जायकवाडी धरणातून शहरात पाणी पुरवठा केला जात असला तरी नियोजनाचा आणि साठवणुकीचा अभाव असल्यानं शहरात पाण्याचा प्रश्न कायम आहे. शहरात अंतर्गत रस्त्यांची काम काही प्रमाणात झाले असले तरी अनेक रस्त्याची कामे रखडल्याने ते रस्ते उखडले आहेत.

शहरात मेडिकल कॉलेज मंजूर झालंय पण इमारतीच्या बांधकामाला अजूनही सुरुवात झाली नसल्यानं रुग्णसेवेवर त्याचा ताण निर्माण होत आहे. लोखंडी सळई तसेच कृषीमाल,फळे भाजीपाला यांची निर्यात करता यावी यासाठी गेल्या 10 वर्षांपासून ड्रायपोर्ट तयार करण्यात आला. त्यांचं उदघाटन देखील अलीकडच्या काळात झालं पण तो प्रकल्प अजूनही कार्यान्वित झालेला नाही. जालना-खामगाव रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने देखील पुढाकार घेतला असला तरी या मार्गाचं स्वप्न अजूनही अपूर्णच आहे.

जालना -जळगाव या नव्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी कोट्यावधी रुपयाचा खर्च करण्यात आला आहे. मात्र या मार्गाला कधी परवानगी मिळणार? हा प्रश्न कायम आहे.  मोसंबीच्या जिल्ह्यात हजारो हेक्टरवर बागा आहेत पण मोसंबीवर प्रक्रिया करणारा उद्योग नसल्यानं मोसंबी उत्पादक हतबल झालेत.मोसंबी संशोधन केंद्र आहेत मात्र आपुरा निधी रिक्त पदे भरल्या जात नसल्याने असून खोळबा अशी अवस्था आहे. त्यांतच कपाशी,तूर,मका,सोयाबीन उत्पादन जास्त असताना ही प्रक्रिया उद्योगाचा आभाव आहे. 25 वर्षात एक ही मोठा सिंचन प्रकल्प नसल्याने कृषी क्षेत्रात सिंचनाचा अभाव आहे.

 

 

You may have missed