जालना : 7 मे ते 10 मे पर्यंत होणार होम वोटिंग

घरोघरी जाऊन मतदान घेण्याचा निर्णय प्रक्रियेस 07 मे पासून होणार सुरुवात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिली माहिती

 

जालना :  13 मे 2024 रोजी  जालना लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यावेळेस पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी 85 वर्षापेक्षा जास्त असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि दिव्यांग मतदारांसाठी घरोघरी जाऊन मतदान घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रक्रियेस 07 मे पासून सुरुवात होणार आहे अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिली

106 फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील 85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या जेष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांपैकी ज्या ज्या मतदारांनी घरी मतदान करण्याबाबत अर्ज सादर केलेले आहेत अशा अर्ज सादर केलेल्या मतदारांसाठी घरोघरी जाऊन मतदान करून घेण्याच्या प्रक्रियेस  07 मे 2024 पासून सुरुवात होणार आहे. सदरील प्रक्रिया दिनांक 10 मे 2024 पर्यंत चालू राहणार आहे. यांचे मतदान सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत घरोघरी जाऊन घेण्यात येणार आहे अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिली. यासाठी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा कानगुले यांचे मार्गदर्शन लाभले.

 

7 मे 2024 रोजी सकाळी नऊ ते पाच या दरम्यान होम वोटिंग साठी मतदान अधिकारी यांचे पथक पुढील गावांमध्ये जाणार आहे ममनाबाद बोधेगाव खुर्द, बोधेगाव बुद्रुक,बाबरा शेवता खुर्द,बोरगाव अर्ज, पेंडगाव,साताळा बुद्रुक, उमरावती आळंद नायगव्हाण मुर्शिदाबादवाडी सांजुळ गणोरी कान्होरी पाल कविटखेडा महालकिन्होळा, वडोदखुर्द, भावडी लाडगाव करमाड, गाडे जळगाव शेकटा, डोंगरगाव कवाड पिंपळगाव गांगदेव,आडगाव खुर्द,अंजनडोह हातमाळी शेलुद, लाडसावंगी कोनेवाडी दिनांक आठ मे 2024 रोजी मतदान अधिकारी यांचे पथक करंजगाव शेवगाव दुधड बनगाव जयपूर गोलटगाव बिकापूर पिसादेवी पळशी बाकापुर धामणगाव वाघोळा लोहगडनांद्रा, वडोदबाजार फुलंब्री, पानवाडी रेलगाव पिंपळगाव वळण, जातेगाव बाबुळगाव तरटे, गिरसावळी मारसावळी गेवराई पायगा, गेवराई गुंगी निमखेडा हिवरा कान्हेगाव, चिंचोली नकीब येथे जाणार आहे.  9 मे 2024 रोजी पथक शिरोडी खुर्द, शिरोडी बुद्रुक, जानेफळ डोंगरगाव शिव, वावना नायगाव वडखा सुलतानपूर मुकुंदवाडी भांबर्डा येथे जाणार आहे

You may have missed