नांदेड जिल्ह्यात सुर्य आग ओकतोय तापमान 42.82 डीग्री सेल्सीअस

उन्हाळी सुट्ट्या लग्नसराईची धामधूम यामुळे लालपरी हाउसफुल !

नांदेडसह नायगांव तालुका परीसरात सर्वत्र लग्नसराईची धामधूम सुरु असून त्यातच विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या देखील लागले आहेत त्यामुळे कोणी मामाच्या गावाला तर कोणी लग्न समारंभाला जात असल्यामुळे प्रवास करण्यासाठी सर्वसामान्यांची असलेली लाल परी एसटी बस हाऊसफुल जात असताना दिसून येत आहे.

सध्या उन्हाचा पारा प्रचंड वाढला असून 42 . 82 तर कुठे – कुठे 43 डीग्री सेल्सिअस असे सर्वाधिक तापमान नांदेड जिल्ह्यामध्ये नोंद झाले आहे . त्यामुळे नागरीकांनी उन्हापासून बचाव करणे स्वताची काळजी घेणे गरजेचे वाटते . दरम्यान नरसी बसस्थानकातून नांदेड , हैदराबाद , निजामाबाद , पंढरपूर , उदगीर , औराद , बिदर , छत्रपती संभाजीनगर , लातूर , पंढरपूर , परभणी जाणाऱ्या मार्गावरील बसेस रोजच प्रवाशांच्या गर्दीने खचाखच भरून जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे . दरम्यान लांब पल्ल्याच्या मार्गावर एसटी बसेसची संख्या कमी असल्याने या मार्गावरील बसेसची संख्या वाढवावी अशी मागणी देखील प्रवाशांतून होत आहे.

सध्या एसटी महामंडळाने बस प्रवासात महिलांना अर्धे तिकीट ही सवलत दिली त्यामुळे महिला प्रवासी बस मधून प्रवास करण्यास पसंती देतात . तसेच वृद्ध नागरिकांना मोफत प्रवास यामुळे देखील बस प्रवासी संख्येमध्ये दुपटीने वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे . दरम्यान काळात एसटी महामंडळाच्या बसेस खचाखच भरून जात असल्याचे बोलके चित्र अनेक ठिकाणी बघावयास मिळते आहे.

You may have missed