MCN NEWS SPCIEAL INTERVIEWS | 02.05.2024 GALLI TE DELHI लंकेंची मुसंडी: विखेंपुढे आव्हान
Sujay Vikhe Patil on Nilesh Lanke : पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh lanke) यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. राजीनामा देताना त्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून (Ahmednagar South Lok Sabha Constituency) निवडणूक लढवण्यास निलेश लंके इच्छुक आहेत. ते राष्ट्रवादी शरद पवार गटातून निवडणूक लढणार आहे. भाजपकडून (BJP) अहमदनगरच्या जागेवर विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखे पाटील विरुध्द निलेश लंके लढत होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर सुजय विखे पाटील यांनी भाष्य केले आहे.
सुजय विखे पाटील म्हणाले की, लंकेंनी राजीनामा का दिला? तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, त्यावर मी भाष्य करणार नाही. त्यांनी सभेदरम्यान जे आरोप केले त्याचे उत्तर मीडियाच्या माध्यमातून नाही तर सभेतून देऊ. आमचे कार्यकर्ते त्यांच्या आरोपांना उत्तर देतील, असं त्यांनी म्हटले आहे.
More Stories
मालवण(Malvan):जयदीप आपटेचे वकील सिंधुदुर्गात दाखल, स्ट्रॅटेजी तयार, जामीन मिळवण्यासाठी पडद्यामागे हालचाली? जयंत पाटलांचा गंभीर आरोप
Bangladesh Violence:कधीकाळी अख्खं कुटुंब संपलं, पण शेख हसीना थोडक्यात बचावल्या, भारतानं दिलेला आश्रय; इंदिरा गांधींसोबत खास कनेक्शन
केरळ(Kerala):अदाणी समूहाच्या विळिण्यम बंदराने रचला इतिहास, 2000 हून अधिक कंटेनर घेऊन पहिली मदर शिप दाखल.