इम्तियाज़ फ़ायद्यात? विनोद पाटील माघार.. वंचित संभ्रमात?

छत्रपती संभाजीनगर  लोकसभा मतदारसंघाच्या विजयाचे गणित माझ्याकडे आहे, असे म्हणत विनोद पाटील यांनी या लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याचा एक दिवस आधी त्यांनी माघार घेतली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनोद पाटील यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. विनोद पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असली तरी देखील त्यांनी महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांना पाठिंबा जाहीर केलेला नाही. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनोद पाटील यांच्या घरी घेतलेले भेट महत्त्वाची मानली जात आहे. या माध्यमातून या मतदारसंघांमध्ये भुमरे यांच्या विजयाचे गणित जुळवण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना, अशी लढत होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार संदिपान भुमरे हे निवडणुकीच्या मैदानात आहे. याचबरोबर एमआयएम पक्षाचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांना देखील पक्षाने पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. मात्र, यातच विनोद पाटील यांच्या वतीने महायुतीकडे उमेदवारी मागण्यात आली होती. मात्र, महायुतीने उमेदवारी न दिल्यामुळे विनोद पाटील यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली होती. तेव्हापासूनच महायुती मध्ये विनोद पाटील बंडखोरी करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. विनोद पाटील यांनी आपल्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या भेटी देखील घेतल्या होत्या. मात्र, तरी देखील त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस पूर्वीच त्यांनी आपण निवडणुकीतून माघार घत असल्याचे जाहीर केले होते.

विजयाचे गणित असल्याचा विनोद पाटील यांचा दावा

आपल्याकडे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून विजयाचे गणित आहे. त्यामुळे मी अपक्ष जरी निवडणूक लढलो, तरी नक्की विजयी होईल, असा विश्वास विनोद पाटील यांनी व्यक्त केला होता. मात्र, माझा पराभव झाला तर मी कुणाला तरी पाडण्यासाठी उभा होतो का? असा डाग माझ्यावर लागू शकतो. हा डाग माझ्यावर लागू नये, यामुळेच आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे विनोद पाटील यांनी जाहीर केले होते.

पहा विडिओ

You may have missed