Sunil Chhetri Retirement: भारत आणि कुवेत यांच्यात विश्वचषक पात्रता फेरीचा सामना 6 जून रोजी होणार आहे. भारतीय दिग्गज म्हणून ओळख असलेल्या सुनील छेत्रीचा हा शेवटचा सामना ठरणार आहे.
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने (Sunil Chhetri) निवृत्ती जाहीर केली आहे. विश्वचषक पात्रता फेरीत कुवेतविरुद्ध तो शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार असल्याचे सुनील छेत्रीने सांगितले. भारत आणि कुवेत यांच्यात विश्वचषक पात्रता फेरीचा सामना 6 जून रोजी होणार आहे. भारतीय दिग्गज म्हणून ओळख असलेल्या सुनील छेत्रीचा हा शेवटचा सामना ठरणार आहे.
सुनील छेत्रीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द खूप चांगली राहिलेली आहे. सुनील छेत्रीने भारतासाठी 145 सामने खेळले. 20 वर्षांच्या या कारकिर्दीत त्याने 93 गोल केले. पण त्याने आता निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. एक्स (आधीचे ट्विटर)वर एक व्हिडीओ शेअर करत सुनील छेत्रीने निवृत्तीची घोषणा केली. मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे, असं म्हणत सुनील छेत्रीने जवळपास 9 मिनिटांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
सुनील छेत्री भावूक- (Sunil Chhetri Retirement)
सुनील छेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो निवृत्तीची घोषणा करताना खूपच भावूक असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये सुनील छेत्रीने पदार्पणाच्या सामन्याची आठवण काढली. याशिवाय तो त्याच्या सुखी सरांबद्दल सांगताना दिसतो. खरे तर सुनील छेत्रीच्या पहिल्या सामन्यात सुखी सर प्रशिक्षक होते. सुनील छेत्री म्हणतो की, तो त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातील भावनांचे वर्णन करू शकत नाही. त्या सामन्यात मी माझा पहिला गोल केला. विशेषत: जेव्हा मी टीम इंडियाची जर्सी घातली होती, तेव्हा एक वेगळीच अनुभूती होती, तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही, असं सुनील छेत्रीने सांगितले.
More Stories
बर्मिंघम(Birmingham)शुभमन गिलचं धडाकेबाज द्विशतक, 21 चौकार, 2 षटकारांसह 311 चेंडूत 200 धावा
vinesh phogat disqualified: विनेश फोगाटचं वजन कसं वाढलं, वजनाकडे कसं दुर्लक्ष झालं? चूक कोणाची?
आयपीएल(IPL 2025): T20 वर्ल्ड कप गाजवणारा भारताचा सुपरस्टार होणार पंजाब किंग्जचा कोच?