IPL 2024: यंदाचा चषक आरसीबी उंचावणार, सुनिल गावस्कारांनी केले भाकीत

IPL 2024  : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल 2024 प्लेऑफच्या सामन्याला सुरुवात झाली. कोलकाता, हैदराबाद, राजस्थान आणि आरसीबी यांच्यामध्ये चषकासाठी आमनासामना होणार आहे.

IPL 2024  : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल 2024 प्लेऑफच्या सामन्याला सुरुवात झाली. कोलकाता, हैदराबाद, राजस्थान आणि आरसीबी यांच्यामध्ये चषकासाठी आमनासामना होणार आहे. क्वालिफायर 1 साठी आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामध्ये लढत सुरु आहे. 22 मार्च रोजी राजस्थान आणि आरसीबी यांचा आमनासामना होणार आहे. प्लेऑफचे सामने सुरु झाल्यानंतर आयपीएल 2024 विजेत्याबाबात वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. भारताचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांनीही यंदाच्या विजयाचं भाकीत केलेय. गावसकरांच्या मते, यंदाचा आयपीएल चषकावर आरसीबी नाव कोरेल. गावस्कारांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

कोलकाता आणि हैदराबाद यांच्यातील क्वालिफायर सामन्याआधी स्टार स्पोर्ट्सवर समालोचकांनी विजेत्याबाबत अंदाज व्यक्त केला. सुनिल गावस्कर यांनी आरसीबीला विजयाचा दावेदार असल्याचं सांगितले. त्याशिवाय चेन्नईचा माजी खेळाडू अंबाती रायडू यानेही आरसीबीवरच डाव खेळला. अंबाती रायडू म्हणाला की, दबावात आरसीबीला शानदार खेळताना कधीच पाहिले नाही. यंदाच्या हंगामात आरसीबीने शानदार खेळ केलाय. यंदाच्या हंगामात आरसीबी वेगळ्या पद्धतीने आपली छाप सोडत आहे.