Dombivli Boiler Blast: डोंबिवली स्फोटात नेमकं काय घडलं, तीन-चार किमीपर्यंत हादरे, बॉयलरचा स्फोट नेमका कशामुळे?

Dombivli Blast News : डोंबिवली पूर्वेतील MIDC मधील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट (dombivli blast) झाला. स्फोटामुळे डोंबिवली अन् आजूबाजूचा परिसर हादरला. हा स्फोट (boiler blast in dombivli) इतका भीषण होता की हवेत धुराचे लोळ दिसत होते.

Dombivli Blast News : डोंबिवली पूर्वेतील MIDC मधील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट (dombivli blast) झाला. स्फोटामुळे डोंबिवली अन् आजूबाजूचा परिसर हादरला. हा स्फोट (boiler blast in dombivli) इतका भीषण होता की हवेत धुराचे लोळ दिसत होते. इतकंच नाही तर या स्फोटामुळे (dombivli midc blast) डोंबिवलीतील रहिवाशी इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. बॉयलरच्या स्फोटाचा आवाज 3 ते चार किलोमीटरपर्यंत ऐकू आला आणि आजूबाजूच्या घरांच्या, हॉटेल्स आणि ऑफिसच्या काचा फुटल्याचं सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या, असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या घटेनीच दखल घेतली असून तात्काळ प्रशासनाला नियंत्रण मिळवण्याचे आदेश दिले आहेत. अमुदान केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. तीन तासानंतरही हा स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबतची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. प्रशासनाकडून याबाबत कोणताही माहिती देण्यात येत नाही.

 

आठ जण जखमी –

डोंबिवली पूर्वेतील केमिकल कंपनीचा बॉयलर फुटल्यामुळे लागलेली भीषण आग तीन तासानंतरही अजूनही आटोक्यात आलेली नाही. आतापर्यंत आठ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेले आहे. जखमींवर डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  अग्निशमन दलाच्या सहा ते सात गाड्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.

जवळच्या तीन कंपन्यांनाही लागली आग ?

अमुदान केमिकल कंपनीच्या बॉयलरच्या स्फोटाचा आवाज 3 किलोमीटरपर्यंत ऐकू आला. बॉयलर्सचे तुकडे दीड किलोमीटर अंतरावर पडलेत, सगळ्या सोसायट्यांमधील इमारतींच्या काचा फुटल्या आहेत, अशी माहिती स्थानिक प्रत्यदर्शींनी दिली आहे. इतकेच नाही तर स्फोटानंतर ही आग जवळच्या तीन कंपन्यांपर्यंत पसरली आहे. या दुर्देवी घटनेतील जखमींवर डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अग्निशमन दलाच्या सहा ते सात गाड्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.

भूकंप आल्याप्रमाणे लोकांची धावपळ –

केमिकल कंपनीमध्ये दुपारी एक सव्वा एकच्या आसपास स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर जवळच्या कंपन्यांनाही आग लागल्याचं समोर आले. हा स्फोट इतका भीषण होता की हवेत धुराचे लोळ दिसत होते. आजूबाजूलाही काही दिसत नव्हते. या स्फोटामुळे दीड किलोमीटर परिसर हादरुन गेला, दीड किलोमीटरमधील गाड्यांच्या आणि बिल्डिंगच्या काचा फुटल्या आहेत. लोक भूकंप आला त्याप्रमाणे पळत होते. आजुबाजूच्या परिसरातील एकाही सोसायटीच्या काचा राहिलेल्या नाहीत, सगळ्या काचा तुटून गेल्या आहेत. बॉयलर्सचे जे तुकडे उडाले ते दीड किलोमीटर अंतरावर पडले आहेत. हे तुकडे चारचाकी गाड्यांवर पडून गाड्या दबल्या आहेत, अशी माहिती स्थानिक रहिवाशी संजय चव्हाण यांनी दिली.सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने आगीवरती नियंत्रण मिळवीण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती अग्निशामन केंद्राकडून देण्यात आली.

You may have missed