Kangana Ranaut : अभिनेत्री आणि मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या विजयी उमेदवार कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) कानशिलात लगावली असल्याची माहिती समोर आली आहे. चंदिगड विमानतळावर सीआयएसएफच्या महिला जवानाने कानशिलात लगावली असल्याचा आरोप अभिनेत्री कंगना रणौतने केला आहे.
हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकल्यानंतर कंगना रणौत आज दिल्लीला रवाना झाली. त्या दरम्यान ती चंदिगड विमानतळावर असताना तिला सीआयएसएफच्या महिला जवानाने मारहाण केली असल्याचे आरोप कंगनाने केला आहे.
समोर आलेल्या वृत्तानुसार, कंगनाने शेतकरी आंदोलनादरम्यान महिला आंदोलकांबाबत वक्तव्य केले होते. त्याच वक्तव्यावर नाराज असलेल्या सीआयएफएफच्या महिला जवान कुलविंदर कौर यांनी कानशिलात लगावली असल्याचा आरोप कंगनाने केला.
कंगना रणौतला का मारले?
कंगनाच्या राजकीय सल्लागारांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदिगड विमानतळावर हा सगळा प्रकार घडला. सीआयएफएफच्या महिला जवानाने कंगनाच्या कानशिलात लगावली. कंगनासोबत गैरवर्तवणूक करणाऱ्या महिला सीआयएसएफ जवानावर कारवाई करावी. शेतकरी आंदोलनावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सीआयएसएफ महिला जवान कंगनावर नाराज होती.
More Stories
Heera Sohal Sizzling Photos:हनी सिंहची रुमर्ड गर्लफ्रेंड हीरा सोहल घायाळ करणाऱ्या अदा; किलर लुक्सनी इंटरनेटचा पारा चढला!
लातूर(Latur): NEET पेपरफुटी प्रकरण, ZP शिक्षकाच्या बँक खात्यात मोठी उलाढाल; आरोपीला आणखी 2 दिवसांची सीबीआय कोठडी
मुंज्या(Munjya): बॉक्स ऑफिसला झपाटून सोडणारा ‘मुंज्या’ मराठी का केला नाही? दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने सांगितलं कारण