बार्बाडोस(Barbados): रोहित शर्मानंतर उपकर्णधार हार्दिक पांड्याही आला पुढे;टी-20 विश्वचषक ट्रॉफीसोबत खास फोटोशूट!

कर्णधार रोहित शर्मानंतर आता उपकर्णधार हार्दिक पांड्यानेही खास फोटोशूट केलं आहे.

बार्बाडोस(Barbados): टीम इंडियाने 29 जून 2024 रोजी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरले. 2013 नंतर टीम इंडियाने आयसीसी ट्रॉफी जिंकली.

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 176 धावा केल्या. भारताकडून विराट कोहलीने 59 चेंडूत सर्वाधिक 76 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकात 8 विकेट गमावत 169 धावाच करू शकला. अशा प्रकारे भारताने हा सामना 7 धावांनी जिंकला.

भारताने वर्ल्ड कप जिंकला, तेथे कर्णधार रोहित शर्माचे एक खास फोटोशूट करण्यात आले.

कॅरेबियन बेटांवर भारताने विश्वचषकाची ट्रॉफी जिंकली. त्याच बेटांवरील पिचवरचे गवत खाऊन रोहित शर्माने त्या मातीचे, धरतीचे आभारही मानले.

रोहित शर्मानंतर आता उपकर्णधार हार्दिक पांड्यानेही खास फोटोशूट केलं आहे.

अंतिम सामन्यातील विजयानंतर हार्दिक पांड्या अत्यंत भावूक झाला. त्यानंतर हार्दिकने आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करुन दिली.

हा विजय खूप काही आहे. आम्ही खूप भावूक झालो आहोत, आम्ही मेहनत करत होतो पण काहीतरी राहून जात होते. पण आज संपूर्ण देशाला जे हवे ते आम्ही करुन दाखवले. गेल्या सहा महिन्यांचा काळ पाहता हा विजय विशेषत: माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, असं हार्दिक पांड्या म्हणाला.

माझ्यासोबत काही गोष्टी अयोग्य घडल्या होत्या. मी त्या काळात एकही शब्द बोललो नव्हतो. पण मला माहिती होतं की, मी सातत्याने मेहनत करत राहिलो तर मी झळाळून निघेने आणि मला हवं ते साध्य करेन. त्यासाठी अशी संधी मिळणे हे अधिक विशेष आहे, असे हार्दिक पांड्याने म्हटले.

You may have missed