नवी दिल्ली(New Delhi): 23 जुलै रोजी सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प, 22 तारखेपासून अधिवेशनाला सुरुवात होणार

एनडीए सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे.

नवी दिल्ली(New Delhi): अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी जाहीर करण्यात आला आहे. 22 जुलैपासून अधिवेशनाला सुरुवात होणार असून हे अधिवेशन 12 ऑगस्टपर्यंत चालेल. 2024-2025 वर्षासाठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करतील. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यासाठी संसदेचे सत्र बोलावण्यात आले होते. 24 जून ते 2 जुलैदरम्यान हे सत्र बोलावण्यात आले होते. सरकार स्थापन झाल्यानंतर हे पहिले पूर्णवेळ अधिवेशन असणार आहे. या अधिवेशनात अर्थसंकल्प 23 जुलै रोजी सादर करण्यात येणार आहे.

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी X वर पोस्ट करताना म्हटले आहे की, “माननीय राष्ट्रपतींनी संसदेच्या दोन्ही सदनांचे अदिवेशन 22 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीमध्ये बोलावण्यासाठी मंजुरी दिली आहे. 2024-2025 सालचा केंद्रीय अर्थसंकल्प 23 जुलै 2024 रोजी सादर करण्यात येईल.” भाजपप्रणित एनडीएसाठी हे अधिवेशन हे कसोटीचे ठरणार आहे. खासदारांच्या शपथविधीसाठी आयोजित करण्यात आलेल्या अधिवेशनामध्ये विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला होता. या अधिवेशनात नीट-युजी परीक्षेसह इतर विषयांवरून विरोधकांनी सरकारला घेरले होते.

You may have missed