काळा गणपती मंदिरासमोर भीषण अपघात,सहा जणांना भरधाव कारने चिरडले
कारचालक घटना स्थळावरून फरार; तर एम आय डी सी पोलिसांनी अवघ्या काही तासात घेतले चालकाला ताब्यात
छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar): शहरातील सिडको परिसरात असलेल्या काळा गणपती मंदिरासमोर आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास मंदिरात येणारे भाविक आणि पायी जाणाऱ्या सहा जणांना भरधाव कारने चिरडले यामध्ये एका जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती कळत आहे तर जखमी झालेल्या तीन जणांवर संभाजीनगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे तर उर्वरित तीन जणांवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar)प्रशांत एकनाथ मगर हा तरुण क्रीडा संकुल येथून टेनिस खेळून आपल्या घरी जात असताना सिडको तील काळा गणपती मंदिरात परिसरात त्याच्या जवळील चार चाकीचा ताबा सुटत ह्या गाडीने चक्क रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या सहा व्यक्तींना चिरडले हा अपघात एवढा भीषण होता की त्यातील एक व्यक्ती जागीच ठार झाला असून इतर जखमी झालेल्या नागरिकांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर काळा गणपती मंदिराचे सुरक्षारक्षक गुणाजी लक्ष्मणराव शेवाळे, वय 70 वर्ष हे जखमी होऊन, मयत झाले आहे तर मनीषा विकास समधाने, वय 40 वर्ष, 2) विकास समधाने, वय 50 वर्ष यांना MGM हॉस्पिटल येथे उपचाराकरिता दाखल केले आहे. तसेच जखमी 3) रवींद्र भगवंतराव चौबे, वय 65 वर्षे, 4) श्रीकांत प्रभाकर राडेकर, वय 60 वर्ष यांना मिनी घाटी हॉस्पिटल येथे उपचाराकरिता दाखल केले असुन, त्यांचे नातेवाईक त्यांना दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये उपचार करिता घेऊन गेले आहे.तर या घटनेची माहिती मिळताच सिडको विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुदर्शन पाटील एम सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमांना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले व फरार झालेले प्रशांत मगर यास अपघाताच्या काही तासातच अटक केली असून त्याच्या विरोधात एम सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
More Stories
नाशिक(Nashik):नाशिकमध्ये जोरदार पाऊस! गोदावरीच्या पाणीपातळ्यात वाढ, 9 धरणांमधून विसर्ग सुरु
नागपूर(Nagpur):ठाकरे पिता-पुत्रांना खोट्या प्रकरणांत अडकवा, जबाब तपास यंत्रणांसमोर द्या, अनिल देशमुखांवर फडणवीसांचा दबाव; श्याम मानवांचा गंभीर आरोप
नागपूर(Nagpur):’कुठे आहे स्फोटक परिस्थिती?’ तायवाडेंनी कोणाला केला सवाल?