Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या रणधुमाळीत एकमेकांवरील आरोपांना धार चढली आहे. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर महायुतीतून त्यांच्याविरोधात दारुगोळा जमा करण्यात आला आहे. महायुतीतील या बेड्या नेत्याने त्यांचावर मोठा हल्लाबोल केला. 
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये धामधूम वाढली आहे. या रणधुमाळीत एकेमकांविरोधात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी दारुगोळा जमवला आहे. आरोपांच्या फैरी सुरु आहेत. तर अधून मधून वार-प्रतिवार पण सुरु आहेत. शरद पवार यांनी पक्षाचा शपथनामा जनतेसमोर मांडला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर तोंडसूख घेतले. .“गेल्या दहा वर्षांत शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. अमित शहांनी आधी हे सांगावं की गेल्या दहा वर्षांत त्यांनी आत्महत्या थांबवण्यासाठी काय काम केलं?” असा सवाल पवारांनी केला. त्यावर आता महायुतीमधील या बड्या नेत्याने हल्लाबोल केला.
शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्व असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यावर त्यांनी टीका केली. शरद पवारांचा शपथनामा म्हणजे जगातील सगळ्यात मोठी फसवणूक असल्याचे ते म्हणाले. शरद पवारांनी धोका दिलेल्या घटनाक्रमांचा दाखला देत बावनकुळेंचा पवारांवर निशाणा झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करुन पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
पवार आणि शपथेचा काय संबंध?
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने “शपथनामा” नावाने लोकसभा निववडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी हल्लाबोल केला. हा शपथनामा जगातील सगळ्यात मोठी फसवणूक म्हटली पाहिजे. खरंच शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का? असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्रात शपथेला प्राणापेक्षा अधिक महत्व आहे, असे सांगत त्यांनी पवारांनी कोणाची कधी आणि कशी फसवणूक केली, याची जंत्रीच वाचून दाखवली.
More Stories
रुपाली चाकणकर(Rupali Chakankar on Supriya Sule):सुप्रिया सुळेंनी 2 कोटी 40 लाख महिलांची माफी मागावी, रुपाली चाकणकरांचा हल्लाबोल, म्हणाल्या बदला घ्यायचा असेल तर तुतारीला मतदान करु नका
मुंबई (Maharashtra Assembly Elections 2024): मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
बारामती(Baramati):लोकसभेला सुनेत्रा पवार, आता विधानसभेला जय पवार बारामतीतून रिंगणात उतरणार?