‘ही माझी शेवटची निवडणूक’ असा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या प्रचाराचा भावनिक मुद्दा. दुसरा मुद्दा ‘मी कोणाचं वाईट केलं नाही’ आणि पुढे जात चंद्रकांत खैरे म्हणतात, ‘गेल्या वेळी चूक केली होती, ती आता पुन्हा करू नका’ या काही वाक्यांसह चंद्रकांत खैरे प्रचारात उतरले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : ‘ही माझी शेवटची निवडणूक’ असा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या प्रचाराचा भावनिक मुद्दा. दुसरा मुद्दा ‘मी कोणाचं वाईट केलं नाही’ आणि पुढे जात चंद्रकांत खैरे म्हणतात, ‘गेल्या वेळी चूक केली होती, ती आता पुन्हा करू नका’ या काही वाक्यांसह चंद्रकांत खैरे प्रचारात उतरले आहेत. दुसरीकडे एमआयएमचे नेते असदोद्दीन ओवेसी यांनी इम्तियाज जलील यांनी केवळ एकाच समुदायासाठी काम केले आहे का, त्यांनी त्यानी हिंदू- मुस्लिमांमध्ये वाद घडावा असे प्रयत्न केले का, त्यांनी दलितांवर अन्याय होणाऱ्यांची साथ केली का, असा प्रश्न विचारत प्रचार सुरू केला आहे.
३० वर्षं ज्यांनी ‘खान की बाण’ असा प्रचार केला त्यांचा बाण कुठे गेला, असा असा प्रश्न विचारत ओवेसींनी टीका करायला सुरुवात केली आहे. तुमची शेवटची निवडणूक २०१९ मध्येच झाली. आता ही निवडणूक तुमची नाही, अशी टीका आता सुरू झाली आहे. या सर्व प्रचार धुराळ्यात ‘महायुती’चा उमेदवार ठरलेला नसल्याने शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे नेते शांत आहेत. यातील केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडे हिंगोली, परभणी आणि नांदेड लोकसभेच्या प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी अद्यापि भाजपला जागा मिळावी यासाठीचे प्रयत्न सुरूच ठेवले असले तरी ते आता पूर्ण होण्याची शक्यता नसल्याचे भाजपचे कार्यकर्तेच सांगतात. चंद्रकांत खैरे यांनी मात्र सर्व जुने संबंध वापरुन गाठीभेटींना सुरूवात केली आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात ना शिवसेनाचा शिंदे गट सक्रिय आहे ना भाजप. त्यामुळे पहिल्या टप्प्यात प्रचार लढा ठाकरे गट विरुद्ध एमआयएम असा सुरू आहे.
More Stories
छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar):आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध; ठाकरे गट-भाजप आमनेसामने, रामा हॉटेलबाहेर तुफान राडा
जालना(Jalna):मनोज जरांगेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी; उपोषणाचा पाचवा दिवस, अडचणी वाढल्या!
मराठा आरक्षण (Maratha Reservation):मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आंतरवाली सराटीतील उपोषण स्थगित करणार, कारणही सांगितलं, म्हणाले….!