राजस्थानच्या एका खेड्यात राहणाऱ्या महिलेला ईव्हीएम मशीनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दिसला नाही, त्यामुळे तिने मतदानास नकार दिला.
देशभरात उद्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण ८८ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून तब्बल १,२०६ उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये कैद होणार आहे. याआधी १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात १०२ जागांवर मतदान घेण्यात आलं होतं. पहिल्या टप्प्यात ६५.५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. काही भागांमध्ये मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला तर काही ठिकाणी लोकांनी मतदानकडे पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळालं. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील मतदानावेळी राजस्थानमध्ये घडलेल्या एका घटनेची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे. राजस्थानच्या एका खेड्यांत राहणारी महिला मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचली तेव्हा तिला ईव्हीएम मशीनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटोच दिसला नाही. त्यामुळे तिला धक्का बसला. तसेच तिने मतदान केंद्रावर उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितलं की, मी केवळ मोदींनाच मत देणार आहे. मोदी यांनी या घटनेची माहिती दिली तसेच देशभरातील भाजपा कार्यकर्ते आणि बुथ कार्यकर्त्यांना एक महत्त्वाचा सल्लादेखील दिला आहे.
ही घटना राजस्थानच्या सीकर लोकसभा मतदारसंघामधील पिपरानी गावात घडली आहे. सीकर लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल रोजी मतदान झालं. या दिवशी पिपरानी येथील एका शाळेत मतदान केंद्र बनवण्यात आलं होतं. या मतदान केंद्रावर बरीच गर्दी होती. सकाळी ११ च्या दरम्यान, काही ग्रामीण महिला गाणं म्हणत मतदान केंद्रावर दाखल झाल्या. यापैकी एक महिला मत देण्यासाठी आत गेली आणि त्यानंतर आतमधून गोंधळ ऐकू येऊ लागला. त्यानंतर सर्वजण आत गेले. तेव्हा सर्वांनी पाहिलं की मत द्यायला आत गेलेली महिला मतदानास नकार देत होती. कारण तिला ईव्हीएम मशीनवर मोदींचा फोटो दिसला नाही.
More Stories
नवी दिल्ली(New Delhi):संसदेत आज अर्थसंकल्पावरुन घमासान, राहुल गांधी काय बोलणार?
केंद्रीय अर्थसंकल्प(Union Budget 2024):विधानसभा निवडणूक असूनही महाराष्ट्राला अर्थसंकल्पात काहीच का मिळालं नाही, भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाच्या कृतीचा नेमका अर्थ काय?
नवी दिल्ली(New Delhi): 23 जुलै रोजी सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प, 22 तारखेपासून अधिवेशनाला सुरुवात होणार