विशाल पाटील यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर सांगलीत गुरुवारी झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात त्यांच्याविरुद्ध पक्षाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई टाळली असल्याचे स्पष्ट झाले आहेत.
सांगली : विशाल पाटील यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर सांगलीत गुरुवारी झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात त्यांच्याविरुद्ध पक्षाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई टाळली असल्याचे स्पष्ट झाले आहेत. मात्र असा निर्णय घेतानाच सांगलीतील मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार प्रयत्न करावेत, असे आवाहनही मेळाव्यात करण्यात आले.
मविआमध्ये जागावाटपात सांगली मतदारसंघावरून उबाठा शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात मोठा वाद निर्माण झाला होता. जागावाटप अंतिम होण्यापूर्वीच या जागेवर ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर केल्याने कॉंग्रेस संतप्त झाली होती. अगदी जिल्ह्यापासून दिल्लीपर्यंत गेलेल्या वादानंतरही ठाकरे गटाने या जागेवरील आपला दावा न सोडता चंद्रहार पाटील यांची उमेदवारी कायम केली. त्यानंतर कॉंग्रेसचे इच्छुक विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला. त्यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर सांगलीत आज कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन केले होते.
प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा झाला. या वेळी पटोले यांनी मविआच्या उमेदवारीवर काँग्रेसचा नैसर्गिक हक्क असताना तो डावलून उबाठा शिवसेनेच्या वाटय़ाला सांगलीची जागा दिली गेली. यामागे एक मोठे षडय़ंत्र असून, त्याचा योग्य वेळी खुलासा होईलच, पण सद्य:स्थितीत भाजपचा पराभव करायचा या हेतूने आघाडी धर्माचे पालन करून मविआचा उमेदवार विजयी करणे सर्वाची जबाबदारी आहे असेही पटोले यांनी सांगितले. या वेळी माजी मंत्री थोरात व माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगलीच्या भावना तीव्र आहेत हे मान्य केले; मात्र त्यापेक्षा भाजपला पराभूत करणे आवश्यक असल्याचे सांगितले.पाटील यांच्याबाबतचा अहवाल दिल्लीला पाठविला जाईल आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे पटोले यांनी सांगितले.
More Stories
रुपाली चाकणकर(Rupali Chakankar on Supriya Sule):सुप्रिया सुळेंनी 2 कोटी 40 लाख महिलांची माफी मागावी, रुपाली चाकणकरांचा हल्लाबोल, म्हणाल्या बदला घ्यायचा असेल तर तुतारीला मतदान करु नका
मुंबई (Maharashtra Assembly Elections 2024): मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
राज ठाकरे(Raj Thackeray):’पुतळे ही केवळ राजकीय सोय’, महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरुन राज ठाकरे संतापले!