मनोज जरांगे पाटील मतदानासाठी परभणीकडे रवाना

प्रकृती ठीक नसतानाही बजावणार मतदानाचा हक्क!

मनोज जरांगे पाटील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी छत्रपती संभाजीनगरहुन आज सकाळी परभणीतील शहागडला रवाना झाले आहेत. प्रकृती ठीक नसतानाही जरांगे पाटील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ॲम्बुलन्स ने शहागडच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरम्यान मराठा बांधवानी ज्याला पाडायचे त्याला पाडा, ज्याला जिंकवायचे त्याला जिंकवा, पण पाड़णार्याला अस पाडा की त्याला मराठ्यांची ताकद आणि एकजुट दिसली पाहिजे. असे जरांगे पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले…

मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी घेत आहेत सभा

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन आणि लढा उभा केला. मराठा आरक्षणासाठी त्यांनी उपोषणही केलं होतं. निवडणुकीच्या धामधुमीतही मनोज जरांगे राज्यांतल्या विविध भागांमध्ये दौरा करत आहेत. मनोज जरांगेंच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा लागू झाला. मात्र सगे सोयऱ्यांच्या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. मराठा समाजाच्या नागरिकांना हा मुद्दा मनोज जरांगे राज्यातल्या विविध भागांत जाऊन समजावून सांगत आहेत. बीड दौऱ्या दरम्यान त्यांनी प्रकृती बिघडली त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असलेल्या गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

You may have missed