Maharashtra Lok Sabha Election : महाराष्ट्रातील 9 खासदारांना झटका; तिकीट कापले

Maharashtra Lok Sabha Candidates : भाजपने महाराष्ट्रातील सहा खासदारांना उमेदवारी नाकारली आहे. तर शिवसेनेने तीन खासदारांना उमेदवारी नाकारली आहे.

Lok Sabha election 2024 Maharashtra Updates : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची एक चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली होती, ती म्हणजे काही विद्ममान खासदारांची तिकिटे कापली जाणार. आता सर्व पक्षांनी उमेदवार जाहीर केल्यानंतर कुणाचं तिकीट कापलं गेलं आणि कुणाला पुन्हा उमेदवारी मिळाली, हे स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्रात एक दोन नव्हे, तर तब्बल ९ खासदारांची तिकिटे कापण्यात आली आहे. तर दोन खासदारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे उमेदवारी नाकारण्यात आलेले हे खासदार कोण आणि त्यांना तिकीट का देण्यात आलं नाही, हे समजून घेऊयात… (Tickets of 9 sitting MPs from Maharashtra have been cut)

 

कोणत्या पक्षातील कोणत्या विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट देण्यात आलं नाही, हे आधी बघा…

तिकीट कापण्यात आलेल्या विद्ममान खासदारांची सर्वाधिक संख्या भाजपमध्ये आहे. भाजपने तब्बल सहा जणांचे तिकीट कापले आहे, तर एका विद्ममान खासदारांने प्रकृती बरी नसल्याने माघार घेतली आहे.

 

भाजपने तिकीट कापलेल्या खासदारांची नावे

1) पूनम महाजन
2) मनोज कोटक
3) गोपाळ शेट्टी
4) उन्मेष पाटील
5) प्रीतम मुंडे
6) जयसिद्धेश्वर स्वामी

प्रमोद महाजन यांच्या कन्या आणि उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार राहिलेल्या पूनम महाजन यांना यावेळी संधी नाकारली गेली. पूनम महाजन यांच्या मतदारसंघात त्यांच्या विरोधात वातावरण असल्याचा हवाला देत पक्षाने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पक्षातीलच काहींची महाजन यांना उमेदवारी देण्यास विरोध होता. कार्यकर्ते आणि मतदारसंघातील जनतेशी संपर्क नसल्याने त्यांना संधी दिली गेली नाही, अशी माहिती आहे.

You may have missed