दहा वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत समावेश करण्याची प्रक्रिया सुरू…
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय, व ग्रामीण स्तरावरील संबंधित दहा वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा देणाऱ्या कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरळ सेवेने सेवेत समावेश करण्याचा निर्णय दिनांक 18 ऑगस्ट 2023 आणि दि.31ऑक्टोम्बर 2023 रोजी महामंत्री सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत झाला होता.
आता मात्र ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. आज छत्रपती संभाजी नगर शहरातील आरोग्य भवन येथे कंत्राटी बेसवर दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांच्या मार्गदर्शना खाली प्राथमिक कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पार पडली आहे. यावेळी डॉ. बाळकृष्ण लांजेवार, डॉ. प्रशांत बडे, डॉ. संजय मुळे, डॉ. विनायक मुंडे, चंदन गनोरे हे यावेळी उपस्थित होते.
More Stories
मालवण(Malvan):जयदीप आपटेचे वकील सिंधुदुर्गात दाखल, स्ट्रॅटेजी तयार, जामीन मिळवण्यासाठी पडद्यामागे हालचाली? जयंत पाटलांचा गंभीर आरोप
Bangladesh Violence:कधीकाळी अख्खं कुटुंब संपलं, पण शेख हसीना थोडक्यात बचावल्या, भारतानं दिलेला आश्रय; इंदिरा गांधींसोबत खास कनेक्शन
केरळ(Kerala):अदाणी समूहाच्या विळिण्यम बंदराने रचला इतिहास, 2000 हून अधिक कंटेनर घेऊन पहिली मदर शिप दाखल.