मनपाचा पुढाकर अँडव्हेंचर पार्कच्या कामाला देखील सुरुवात
छत्रपती संभाजीनगर : महानगर पालिका प्रशासनाने मुलभूत कामासोबत शहरातील सौंदर्यीकरण व नागरी सुविधांकडे देखील लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. वॉटरपार्कसाठी हर्सुल उद्यानातील जागा जवळपास निश्चीत करण्याची चर्चा सुरु आहे. मात्र अजूनही पर्यायी ४ एकर जागेचा शोध सुरू आहे. आचार संहिता संपताच इच्छूकांकडून वॉटरपार्कसाठी प्रस्ताव मागविण्यात येणार आहे. अशी माहिती मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली.
महापालिकेचे प्रशासक म्हणून जी. श्रीकांत यांनी वर्षभराचा कार्यकाळ पूर्ण केला. या निमित्त पत्रकारांशी बोलताना जी. श्रीकांत म्हणाले की, वर्षभराचा कालावधी नियोजन करण्यामध्ये गेला. मनपाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या प्रयत्नांना यश मिळाले. शहरासाठी राबविण्यात येत असलेली नवीन पाणी पुरवठा योजना या वर्षभरात पूर्ण करण्याकडे लक्ष दिले जाईल. तसेच सेफ्टीक टॅक मुक्त शहर केले जाईल. या सोबतच शहरातील मुलांना खेळण्यासाठी अॅडव्हेंचर पार्क आणि वॉटरपार्क उभारण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. अॅडव्हेंचर पार्कमध्ये साहसी खेळांचा समावेश असणार आहे.
वॉटरपार्क उभारण्यासाठी चार एकर जागेचा शोध सुरू केला आहे. वॉटरपार्कसाठी ईओए तयार करण्यात आले परंतु, लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे ईओए काढता आले नाही. महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणारे हे पहिले वॉटरपार्क असेल. निवडणूकीची आचारसंहिता संपताच वॉटरपार्कसाठी इच्छूकांकडून प्रस्ताव मागविण्यात येतील. कोणत्याही परिस्थिती या वर्षी वॉटरपार्क सुरू करणार असल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले.
पाच स्मशानभूमीचा कायापालट करणार
महापालिकेला पहिल्यांदाच जिल्हा नियोजन समितीच्या नाविण्यपूर्ण योजनेतून पाच स्मशानभूमीचा कायापालट करण्यासाठी दहा कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून स्मार्ट स्मशानभूमी तयार केल्या जाणार आहे. सातार्यातील स्मशानभूमीचे संकल्प चित्र अंतीम करण्यात आले आहे. उर्वरीत चार स्मशानभूमीचे संकल्पचित्र मागविण्यात आले असून ते प्राप्त होताच त्यावर निर्णय घेतला जाईल.
More Stories
मालवण(Malvan):जयदीप आपटेचे वकील सिंधुदुर्गात दाखल, स्ट्रॅटेजी तयार, जामीन मिळवण्यासाठी पडद्यामागे हालचाली? जयंत पाटलांचा गंभीर आरोप
Bangladesh Violence:कधीकाळी अख्खं कुटुंब संपलं, पण शेख हसीना थोडक्यात बचावल्या, भारतानं दिलेला आश्रय; इंदिरा गांधींसोबत खास कनेक्शन
केरळ(Kerala):अदाणी समूहाच्या विळिण्यम बंदराने रचला इतिहास, 2000 हून अधिक कंटेनर घेऊन पहिली मदर शिप दाखल.