अतिरेक्यांना तुम्ही देशात प्रवेश देताच कसे. संशयित लोकं देशात राहतातच कसे. त्यांची कागदपत्रे तपासली जात नाहीत का म्हणत त्यांनी कॅनडाला फैलावर घेतले आहे. भारत याला सहन करेल असं समजू नका असं देखील परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे.
गेल्या काही वर्षात जगभरात भारताचे वर्चस्व खूपच वाढले आहे. भारतासोबत मैत्री करण्यासाठी पाश्चात्य देशच नाही तर आखाती देश देखील आज उत्सूक आहेत. फ्रान्स, रशिया, ब्रिटन सारखे देश भारताच्या बाजुने उभे राहत आहेत. त्यामुळेच भारत देखील आपली ताकद जगाला दाखवत आहे. आता भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी खलिस्तानबाबत कॅनडाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले की, ‘खलिस्तानी फुटीरतावादी घटकांना राजकीय स्थान देऊन कॅनडाचे सरकार कायद्याच्या राज्यापेक्षा त्यांची व्होट बँक अधिक शक्तिशाली असल्याचा संदेश देत आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत परराष्ट्र मंत्री म्हणाले की, भाषण स्वातंत्र्याचा अर्थ अलिप्ततावादाचे समर्थन करण्याचे स्वातंत्र्य नाही. चांगल्या संबंधांसाठी याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.’
संशयास्पद पार्श्वभूमी असलेल्या लोकांना कॅनडामध्ये ( Canada ) राहण्याची परवानगी कशी दिली जाते याबद्दल परराष्ट्रमंत्र्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय. ते देशात कसे आले, त्यांच्याकडे कोणता पासपोर्ट आहे. अत्यंत संशयास्पद कागदपत्रांवर ते आले असतील तर तुमचे यावर उत्तर काय आहे. तुमची व्होट बँक तुमच्या कायद्यापेक्षा अधिक शक्तिशाली आहे का. असा सवाल एस जयशंकर यांनी केला आहे.
कॅनडाच्या भूमीवर कार्यरत असलेल्या खलिस्तान समर्थक घटक यांना कॅनडा अभय देत आहे. एस जयशंकर म्हणाले की, आज कॅनडाच्या राजकारणात प्रमुख पदांवर असे लोक आहेत जे प्रत्यक्षात अशा प्रकारच्या फुटीरतावाद आणि अतिरेक्यांना समर्थन देत आहेत.”
कॅनडातून निर्माण होणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारताची योजना काय आहे यावर बोलताना ते म्हणाले की, चांगले संबंध असले तरी आपण याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. भारताच्या चिंता व्यक्त करतो तेव्हा कॅनडाने म्हणतो की, त्यांना भाषण स्वातंत्र्य आहे. पण काही नवीन मुद्दा नाही. सुमारे 10 वर्षांपासून हे सुरू आहे. आपल्या देशातही भाषण स्वातंत्र्य आहे. परंतु भाषण स्वातंत्र्य म्हणजे परदेशी मुत्सद्दींना धमकावण्याचे स्वातंत्र्य नाही, भाषण स्वातंत्र्याचा अर्थ असा नाही की लोक कॅनडामध्ये घेत असलेल्या पोझिशन्स आणि क्रियाकलापांमुळे आमचे नुकसान होईल.”
कॅनडामध्ये भारतीय प्रवाशांची संख्या सुमारे १८ लाख आणि अनिवासी भारतीयांची संख्या १० लाख आहे.भारतीय स्थलांतरित हे बहुतेक शीख आहेत. कॅनडाच्या राजकारणात ते एक प्रभावशाली गट मानले जातात. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय एजंट्सचा सहभाग असल्याच्या आरोपानंतर भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडले होते. भारताने ट्रुडो यांचे हे आरोप मूर्खपणाचे असल्याचे म्हटले होते.
More Stories
काठमांडू(Nepal Bus Accident):नेपाळमध्ये बस दुर्घटनेत मृत पावलेल्या जळगावच्या भाविकांची संख्या 27 वर, अनेक भाविक बेपत्ता!
मुंबई(Mumbai):व्याजदर अन् रेपोरेट जैसे थे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांची मोठी घोषणा!
मुंबई(Mumbai):विधानसभेआधी ठाकरे- शिंदे वर्षावर भेटले, चर्चा काय झाली?