मविआचे काम करत असल्याने जफर मर्चन्ट यांच्या लेडीज वेअर दुकानावर अज्ञातांकडून दगडफेक….
छत्रपती संभाजीनगर शहरातील फाजलपुरा येथे राजकीय वादातून जफर मर्चन्ट यांच्या लेडीज वेअर दुकानावर अज्ञातांकडून दगडफेक आणि हल्ला करण्यात आल्याची घटना 29 एप्रिल रोजी रात्री घडली. या दरम्यान दुकानात महिला कामगार काम करीत असताना हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती, माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
29 एप्रिल रोजी रात्री ही घटना घडली. जफर मर्चन्ट हे महाविकास आघाडीचे काम करतात याच रागातून काही लोक रात्री तोंडाला रुमाल बांधून आली. यानंतर त्यांनी जफर यांच्या मर्चन्ट ट्रेन्झ या लेडीज वेअर दुकानावर दगडफेक केली. दुकानात महिला कामगार असल्याने त्या घबरल्या. हल्ला केल्यानंतर काही वेळातच हल्लेखोर पसार झाले. माहिती मिळताच सिटीचौक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. यानंतर एसीपी संपत शिंदे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
More Stories
मालवण(Malvan):जयदीप आपटेचे वकील सिंधुदुर्गात दाखल, स्ट्रॅटेजी तयार, जामीन मिळवण्यासाठी पडद्यामागे हालचाली? जयंत पाटलांचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar):आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध; ठाकरे गट-भाजप आमनेसामने, रामा हॉटेलबाहेर तुफान राडा
Bangladesh Violence:कधीकाळी अख्खं कुटुंब संपलं, पण शेख हसीना थोडक्यात बचावल्या, भारतानं दिलेला आश्रय; इंदिरा गांधींसोबत खास कनेक्शन