औरंगाबाद लोकसभा 2024 चा उमेदवारांनी जाहीर केला खर्च.
प्रतिनिधी अन्वरअलमनूर जाफर /mcnnews
औरंगाबाद लोकसभा 2024 निवडणुकीच्या प्रचारादरम्यान,उमेदवारांनी केलेल्या खर्च तपासणीचा दुसरा टप्पा नुकताच पार पडला. यामध्ये पालकमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी आघाडी घेतली आहे. त्यांनी सर्वाधिक निवडणूक खर्च केला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे दुसर्या स्थानी, वंचितचे अफसर खान तीसर्या तर एमआयएमचे इम्तियाज जलील हे निवडणूक खर्चात चौथ्या स्थानी आहेत.
औरंगाबाद :औरंगाबाद लोकसभा दिनांक 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा 95 लाखांपर्यंत ठरवण्यात आली आहे. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी 18 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. 25 एप्रिलपर्यंत उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले. उमेदवारांनी अर्ज भरताना जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या रॅलीपासून सहा मे पर्यंत केलेल्या खर्चाचा हिशोब आणि खर्च कक्षाचे नोडल अधिकारी शेखर कुलकर्णी यांच्याकडे मांडण्यात आला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी 7 लाख 18 हजार 726, शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांनी 17 लाख 79 हजार 241, वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान यांनी 06 लाख 06 हजार 56 रुपये, एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी 5 लाख 95 हजार 130 तर अपक्ष जे.के. जाधव यांनी 5 लाख 74 हजार 510 रुपये, हर्षवर्धन जाधव यांनी 2 लाख 87 हजार 711 रुपये खर्च केल्याची माहिती नोडल अधिकारी कुलकर्णी यांना दिली आहे. यानंतर 11 मे रोजी देखील उमेदवारांना खर्च सादर करायचा आहे.एकूणच निवडणूकीची रणधुमाळी आणि प्रचार शिगेला पोहोचत आहे. कोणता उमेदवार किती खर्च करतो याचा सर्व तपशिल जिल्हा निवडणूक अधिकारीनी दिलेल्या वेळी, कळवावा लागतो प्रत्येक उमेदवाराला हे बंधनकारक आहे. दिनांक 13 मे 2024 रोजी मतदान होणार असून जिल्हातील 20 लाखा पेक्षा जास्तं मतदार यावेळी मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने प्राप्त झाली आहे.
More Stories
छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar):आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध; ठाकरे गट-भाजप आमनेसामने, रामा हॉटेलबाहेर तुफान राडा
जालना(Jalna):मनोज जरांगेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी; उपोषणाचा पाचवा दिवस, अडचणी वाढल्या!
मराठा आरक्षण (Maratha Reservation):मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आंतरवाली सराटीतील उपोषण स्थगित करणार, कारणही सांगितलं, म्हणाले….!