Site icon mcnnews.tv

निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर पोलिसांची मोठी कारवाई ; 39 लाख 60 हजार रूपये एवढे रोकड़ पोलिसांनी केली जप्त

शहरातील पैठण गेटजवळ पोलिसांनी लाखो रूपये पकडले…

 

प्रतिनिधी सुमित दंडुके : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर छत्रपती संभाजीनगर (aurangabad) शहरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पैठणगेट ज्वळील एका मोबाइल च्या दुकानातून पोलिसांनी मोठी रोकड़ जप्त केली आहे. 39 लाख 60 हजार रूपये एवढे रोकड़ पोलिसांनी जप्त केली आहे. यात चार आरोपींना ताब्यात घेण्यत आले आहे.

लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सध्या पैसा आणि अवैध मद्याचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. याच अनुशंगाने शहर पोलीस देखील अलर्ट मोडवर असताना त्याना काही दिवसांपूर्वी पैठणगेट जवळील एका मोबाईलच्या दुकानावर संशय आला. पोलिसांनी लक्ष ठेऊन शेवटी काल रात्री उशिरा या ठिकाणी धाड़ टाकली. यात मोठ्या प्रमाणात रोकड़ आणि पैसे मोजन्याची मशीन सापडली. पोलिसांनी दूकानमालकाला पैश्यासन्दर्भात विचारल्यानंतर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांनी दूकानमालकासह 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे. रमेश खंडूजी बुधवंत, शैलेश भरतलाल राठोड, अस्लम खान इस्माईल खान आणि शेख रिझवान शेख शफी ही आरोपींची नावे आहे.

तसेच त्यांची सध्या चौकशी सुरु आहे. या पैश्यांचा निवडणुकांशी किंवा कोणत्या पक्षाशी संबंध आहे का? याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त झोन-1 नितीन बगाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे आणि त्यांच्या टीमने पार पाडली.

Exit mobile version