बारामतीचे ‘दादा’ बदला!, विधानसभेला युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार सामना रंगणार?
युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. युगेंद्र पवार हे विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार देखील आहेत.
बारामती(Baramati):अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या बारामती(Baramati) लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. बारामतीकरांनी शरद पवार यांना निवडणुकीत कौल दिल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार सामना पाहायला मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण विधानसभा निवडणुकीत बारामतीत अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार मैदानात उतरु शकतात.
बारामतीत काका विरुद्ध पुतण्या? असा संघर्ष पुन्हा पाहायला मिळू शकतो. युगेंद्र पवार यांना बारामतीतून उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे. आम्हाला बारामतीचा दादा बदलायचाय, असं युगेंद्र पवार यांचे कार्यकर्ते म्हणत आहेत.
कोण आहेत युगेंद्र पवार?
युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. युगेंद्र पवार हे विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार देखील आहेत. शरयु ग्रुपच्या माध्यमातून युगेंद्र पवार व्यवसायामध्येही सक्रिय आहेत. फलटण तालुक्यातील शरयू शुगर कारखान्याची जबाबदारी युगेंद्र पवार यांच्यावर आहे. बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे देखील ते अध्यक्ष आहेत.
युगेंद्र पवार हे बारामती लोकसभा निवडणुकीदरम्यान अॅक्टिव्ह दिसले. प्रत्येक मंगळवारी युगेंद्र पवारांचा बारामतीत जनता दरबार असतो. या जनता दरबाराला उस्फुर्त प्रतिसाद देखील मिळत आहे. आज शरद पवारांनी युगेंद्र पवारांच्या जनता दरबाराला उपस्थिती लावत नागरिकांशी संवाद साधला. त्यामुळे आता बारामतीत शरद पवार भाकरी फिरवणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार
बारामतीच्या लोकसभा निवडणुकीत उमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवलं होतं. पण अजित पवारांचं कुटुंब एकीकडे आणि सर्व पवार कुटुंब एकीकडे असं चित्र या निवडणुकीत पाहायला मिळालं. अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांचं कुटुंब देखील अजित पवारांच्या विरोधात दिसलं होते. विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पाहायला मिळणार की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे.
More Stories
नागपूर(Nagpur):ठाकरे पिता-पुत्रांना खोट्या प्रकरणांत अडकवा, जबाब तपास यंत्रणांसमोर द्या, अनिल देशमुखांवर फडणवीसांचा दबाव; श्याम मानवांचा गंभीर आरोप
नागपूर(Nagpur):’कुठे आहे स्फोटक परिस्थिती?’ तायवाडेंनी कोणाला केला सवाल?
रत्नागिरी(Ratnagiri):26 तासांनंतर कोकण रेल्वे रुळावर, पण गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलेलं!