टी-20 वर्ल्ड कपसाठी फलंदाज रिंकू सिंगला भारतीय टीममध्ये संधी मिळावी – शाहरुख खान

सुपरस्टार शाहरुख खाननं कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू रिंकू सिंग याच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

 

आयपीएल मधील मध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केलं. कोलकातानं दिल्ली कॅपिटल्सवर 7 विकेटने विजय मिळवला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वातील कोलकाताच्या टीमनं यंदाच्या स्पर्धेतील सहावी मॅच जिंकली. या मॅचनंतर अभिनेता शाहरुख खाननं मोठं वक्तव्य केलं आहे. आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी फलंदाज रिंकू सिंगला भारतीय टीममध्ये संधी मिळावी, अशी इच्छा शाहरुख खाननं व्यक्त केली. शाहरुख खाननं ही त्याची व्यक्तिगत इच्छा असल्याचं म्हटलं. रिंकू सिंग गेल्यावर्षीच्या आयपीएलमध्ये केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर प्रसिद्धीच्या झोतात आला होता.

वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत 1 जूनपासून सुरु होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा लवकरच होणार आहे. भारताच्या 15 सदस्यीय टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी रिंकू सिंग प्रबळ दावेदार मानला जात आहे. रिंकू सिंगनं भारताकडून 15 टी-20 मॅचमध्ये 176 धावा केल्या आहेत. त्यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

शाहरुख खान मॅच संपल्यानंतर स्टार स्पोर्टसशी बोलत होता. यावेळी तो म्हणाला की शानदार खेळाडू देशासाठी खेळत आहेत, मी रिुंकू सिंगसाठी उत्सूक आहे, इन्शाअल्लाह त्याला वर्ल्ड कप टीममध्ये स्थान मिळावं त्यासह इतर संघांच्या युवा खेळाडूंना देखील संधी मिळावी, असं शाहरुख खान म्हणाला.

शाहरुख खान म्हणाला की अनेक युवा खेळाडू दावेदार आहेत. मात्र, मला वैयक्तिक असं वाटतं रिंकू सिंगला संघात स्थान मिळावी, मला आनंद होईल, असं शाहरुख खान म्हणाला.

You may have missed