ईशान किशनवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीसीसीआयने केली कारवाई
मुंबई इंडियन्स संघाला दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध १० धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या पराभवासह मुंबईच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा अधिक धुसर झाल्या आहेत. पण मुंबईने त्यांच्या उर्वरित सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवला तर त्यांना प्लेऑफमध्ये जाण्याची संधी मिळू शकते. दिल्ली विरूद्धच्या या सामन्यानंतर संघाचा विकेटकीपर फलंदाज इशान किशनला मोठा धक्का बसला आहे. इशानवर कारवाई करण्यात आली आहे.
IPL 2024 स्पर्धेत शनिवारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात सामना पार पडला. अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना पार पडला. दिल्ली कॅपिटल्सने 10 धावांनी मुंबई इंडियन्स संघावर विजय मिळवला.
यावेळी मात्र मुंबई इंडियन्स संघाचा ईशान किशनवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीसीसीआयने कारवाई केली आहे. त्याच्यावर सामना शुल्काच्या 10 टक्के दंडाची कारवाई झाली आहे.बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार ईशान किशनने आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम 2.2 अंतर्गत लेव्हल 1 ची चूक केली आहे. त्याने त्याची चूक मान्य केली असून कारवाईही मान्य केली आहे.लेव्हल 1 च्या चुकीसाठी सामनाधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय हा अंतिम असतो.
IPL आचारसंहितेच्या कलम 2.2 अंतर्गत लेव्हल 1 चूक म्हणजे जसे की स्टंपला मारणे किंवा जाणीवपूर्वक किंवा निष्काळजीपणे जाहिरातींचे बोर्ड, बाईंड्री लाईन, ड्रेसिंग रुमचे दरवाजे, आरसे, खिडक्या किंवा इतर गोष्टींचे नुकसान करण्याबाबत आहे.यामध्ये सामन्यादरम्यान क्रिकेट उपकरणे किंवा कपडे, मैदानी उपकरणांचा गैरवापर देखील समाविष्ट आहे.
More Stories
vinesh phogat disqualified: विनेश फोगाटचं वजन कसं वाढलं, वजनाकडे कसं दुर्लक्ष झालं? चूक कोणाची?
आयपीएल(IPL 2025): T20 वर्ल्ड कप गाजवणारा भारताचा सुपरस्टार होणार पंजाब किंग्जचा कोच?
James Anderson Record:40 हजारांहून अधिक चेंडूंचा मारा, 800 किमीचा रनअप; जेम्स अँडरसनने रचला भीमपराक्रम!