शुभमन गिलनं इतिहास रचत इंग्लंडविरुद्ध द्विशतक झळकावलं आहे.
बर्मिंघम(Birmingham) : भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्त्व शुभमन गिलकडे सोपवण्याचा निवड समितीचा निर्णय योग्य ठरला आहे. शुभमन(shubman) गिलनं बर्मिंघम कसोटीमध्ये द्वीशतक झळकावलं आहे. सुरुवातीला यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा आणि त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर यांच्यासोबत भागीदारी करत भारतीय संघाला समाधानकारक धावसंख्येजवळ शुभमन गिलनं पोहोचवलं आहे. त्यासोबतच शुभमन गिलनं इंग्लंडमध्ये भारताचा कॅप्टन म्हणून सर्वाधिक धावा केल्या आहेत. मोहम्मद अजहरुद्दीन यानं 1990 मध्ये 179 धावांची खेळी केली होती. शुभमन गिलनं दमदार कामगिरी करत भारताला मजबूत स्थितीत पोहोचवलं आहे. शुभमन गिलनं या डावात 21 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत.
शुभमन (shubman) गिलनं भारताचा डाव सावरला
भारतानं काल 211 धावांवर पाच विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा या दोघांनी 203 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळं भारतीय संघ मजबूत स्थितीत पोहोचला. भारतानं 470 धावांचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये यशस्वी जयस्वाल 87 आणि रवींद्र जडेजाच्या 89 धावांचा समावेश आहे. शुभमन गिलच्या द्विशतकी खेळीमुंळं इंग्लंडचा संघ बॅकफूटवर गेला आहे.
भारतानं एजबेस्टनमध्ये यापूर्वी सर्वाधिक 416 धावा केल्या होत्या.