Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदारांमध्ये उत्साह

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदारांमध्ये उत्साह

 

मतदानाच्या दिवशी एक प्रकारे सकारात्मक चित्र छत्रपती संभाजीनगरच्या  अनेक मतदान केंद्रांवर पाहायला मिळत आहे. अगदी सायंकाळी 5नंतर सुद्धा मतदान केंद्रांवर लांब रांगा मतदारांच्या  पाहायला मिळत आहेत. ऊन कमी असल्याने मतदारांचा उत्साह सुद्धा  मतदान केंद्रांवर पाहायला मिळतोय. छत्रपती संभाजी नगर मधील  पुरुष असतील, महिला मतदार असतील किंवा फर्स्ट टाइम वोटर्स असतील त्यांनी सुद्धा मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर येत आपला मतदानाचा हक्क रांगेत लावून बजावला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान

दि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सूरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले आहे.

चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

नंदुरबार – ६०.६० टक्के
जळगाव – ५१.९८ टक्के
रावेर – ५५.३६ टक्के
जालना – ५८.८५ टक्के
औरंगाबाद – ५४.०२ टक्के
मावळ – ४६.०३ टक्के
पुणे – ४४.९० टक्के
शिरूर – ४३.८९ टक्के
अहमदनगर- ५३.२७ टक्के
शिर्डी – ५२.२७ टक्के
बीड – ५८.२१ टक्के

You may have missed