एक खून हडको परिसरात तर दुसरा इटखेड्यात..
प्रतिनिधी सुमित दंडुके/MCN News
छत्रपती संभाजीनगर शहर आज खुनाच्या दोन घटनांनी हादरले आहे. आज सकाळी हे दोन खून उघडकीस आलेत. यातील एक खून हडको एन-11 येथील जोगिंग ट्रेकवर तर दूसरा इटखेड़ा येथे झालाय.
सकाळी नागरिकांनी मृतदेह बघितल्यावर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. हडको येथील SBOA शाळेच्या पाठीमागे असलेल्या जोगींग ट्रेकवर आज सकाळी नागरिकांना मृतदेह आढळला. याची माहिती त्यांनी पोलिसाना दिली. सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे यांनी तात्काळ तपास सुरु करत मृतदेहाची ओळख पट्विली आहे. गणेश जगन्नाथ दराखे ऎसे या मृताचे नाव आहे. तर याच्या मारेकर्यांचा शोध सुरु, लवकरच त्याना ताब्यात घेऊन या खुनाचा छडा लावण्यात येईल अशी माहिती पोलिसांकडून दैन्यता आली आहे. तर दूसरा खून हा इटखेड़ा परिसरात झाला आहे. जुन्या वादातून टोळक्याने एका युवकाचा खून केला आहे. यातील आरोपींचा शोध लावण्यात सातारा पोलिसांना यश आले आहे. मात्र शहरात एकाच दिवशी दोन खुनाच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यामुळे पोलिसांनी यावर काहीतरी तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.

More Stories
छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar):शहरातील सिडको परिसरात असलेल्या काळा गणपती मंदिरासमोर आज भीषण अपघात
मालवण(Malvan):जयदीप आपटेचे वकील सिंधुदुर्गात दाखल, स्ट्रॅटेजी तयार, जामीन मिळवण्यासाठी पडद्यामागे हालचाली? जयंत पाटलांचा गंभीर आरोप
Bangladesh Violence:कधीकाळी अख्खं कुटुंब संपलं, पण शेख हसीना थोडक्यात बचावल्या, भारतानं दिलेला आश्रय; इंदिरा गांधींसोबत खास कनेक्शन