छत्रपती संभाजीनगर :गाडी पार्क करण्यावरून हाणामारी,सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By प्रतिनिधी सुमित दंडुके / mcnnews
छत्रपती संभाजीनगर : दुकानासमोर कार पार्क का केली, असा प्रश्न विचारत चौघांनी मारहाण केल्याची घटना शहरातील मोतीकारंजा परिसरात घडली आहे. याप्रकरणी आरोपींवर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रफिक शेख, साहेब रफिक शेख, सोहेल रफिक शेख व आणखी एक आरोपी (रा.मोती कारंजा) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सम्यक कल्याण डोंगरदिवे यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार १४ मे रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास तक्रारदार सम्यक यांच्या मामानी त्यांची कार रफिक शेख याच्यात कुलरच्या दुकानाच्या बाजूला उभी करून सम्यक यांच्या घरी आले. त्यावर आरोपीने गाडी लावण्यास विरोध करीत “ये तुम्हारे बाप की जगह का” असं म्हणत शिवीगाळ केली. सम्यक हे चुलत भावासह फिर्यादीला समजावून सांगण्यासाठी गेले असता आरोपींनी दोघांनाही शिवीगाळ करून मारहाण केली. साहेब रफिक शेख यांनी हातातील धारदार वस्तूने कपाळावर मारल्याने सम्यक यांच्या डोक्याला जखम झाली. सम्यक यांचे आई-वडील आले असताना त्यांना सुद्धा हाताचापटाने मारहाण केली. यानंतर सम्यक यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलसानि गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत.