chhatrapati sambhajinagar : किराडपुर्यात गॅस सिलिंडरचा स्फोट

दुर्घटनेत एका चिमुकलीचा मृत्यू, इतर जखमी, अरुंद गल्ल्यांमुळे बचाव कार्याला अडचण…

 

chhatrapati sambhajinagar : शहरातील किराड़पुरा परिसरातील रोशन मस्जिद समोरील गल्लीत असणाऱ्या एका घरात 3 मे रोजी रात्रि अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात एका 6 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालाय तर घरातील इतर लोक गंभीर जखमी झाले.अरुंद गल्ल्या असल्यामुळे अग्निशमन दलाला आग विझविण्यासाठी अडचण, तर आगीमुळे शॉर्ट सर्किट देखील झाले.  स्वयंपाक करत असताना गॅस सिलिंडरचा स्फोट झाला.  दुर्घटनेवेळी घरात 10 ते 12 जण असल्याची माहिती मिळाली तर या दुर्घटनेत एका चिमुकलीचा मृत्यू झालाय तर घरातील इतर सदस्य गंभीर जखमी असल्याची प्राथमिक महिती. एसीपी धनंजय पाटलांकडून घटनास्थळाची पाहणी.

इरफ़ान शेख, रिजवान शेख, आमेर शेख आणि सलमान शेख हे चार भाऊ आपल्या कुटुंबासोबत या घरात राहत होते. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर याठिकानि मोठ्या प्रमाणात आग लागली. यात एक चिमुकलीचा मृत्यू झाला. सदब शेख असे या मृत मुलीचे नाव आहे. आग लागताच सगळेजण घराबाहेर पड़त असताना ते गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे ही आग लागली त्यठिकानि अत्यंत अरुंद गल्ल्या आहेत. त्यामुळे अग्निशमन विभागाला मदत कार्य करायला मोठे अडथळे आले. ही आग शेजारच्यांनीच आपल्या घरातील पाण्याने विझविली. दरम्यान पोलीस उपायुक्त नवनीत काँवत, उपायुक्त प्रशांत स्वामी. सहाय्यक आयुक्त धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाड़े, गौतम पातारे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

You may have missed