दुसरीकडे झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीये
दिल्लीचे मुख्यमंत्री( Chief Minister )अरविंद केजरीवाल यांना अखेर दिलासा मिळाला आहे. त्यांना जामीन मंजूर झाला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केलाय. 1 जून पर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. 1 जून पर्यंत हा अंतरिम जामीन असणार आहे. दिल्लीत लोकसभेसाठी 25 मे रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर 2 जून रोजी त्यांना पुन्हा पोलिसांकडे आत्मसमर्पण करावं लागणार आहे. दारु घोटाळ्यात ईडीने अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) यांना 21 मार्च रोजी अटक केली होती.
दुसरीकडे झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीये. त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. हेमंत सोरेन यांनी देखील सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. हेमंत सोरेन यांनी निवडणूक प्रचारासाठी जामीन मंजूर करावा अशी विनंती यात करण्यात आली होती. पण सुप्रीम कोर्टाने म्हटले की, तुमच्या याचिकेवर आता हायकोर्टाने निर्णय दिला आहे, त्यामुळे ही याचिका निष्प्रभ ठरली आहे.
हेमंत सोरेन ( hemant soren )यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने आदेश राखून ठेवला होता, मात्र अद्याप निकाल दिलेला नाही. अटक बेकायदेशीर ठरवणाऱ्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. याआधीही झारखंड हायकोर्टाने माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
हेमंत सोरेन यांनी याआधी आपल्या काकांच्या श्राद्धाला उपस्थित राहण्यासाठी जामीन मागितला होता. मात्र, पोलीस कोठडीत असताना न्यायालयाने त्यांना काकांच्या श्राद्धाला उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन त्यांच्या काकांच्या श्राद्धाला उपस्थित राहणार आहेत.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी त्यांचे मोठे काका राजाराम सोरेन यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी देखील न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र त्यावेळी त्यांची याचिका कोर्टाने फेटाळून लावली होती. पीएमएलए कोर्टाने त्यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला होता.
हेमंत सोरेन यांनी यांचे काका राजाराम सोरेन यांचे २७ एप्रिल रोजी निधन झाले होते. सोरेन यांना त्यांच्या अंतिम संस्कारात आणि श्राद्धात सहभागी होण्याची परवानगी मागितली होती. त्यासाठी त्यांनी १३ दिवसांच्या अंतरिम जामीनासाठी विनंती केली होती.