CSK vs SRH : गायकवाड, देशपांडे चमकले; चेन्नईची हैदराबादवर सहज मात..

CSK beat Sunrisers Hyderabad by 78 runs : आयपीएल २०२४ मधील ४६वा सामना चेपॉक स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबद आमनेसामने आले होते. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबदावर ७८ धावांनी मात केली. चेन्नईच्या या विजयात कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने महत्त्वाची भूमिका बजावली. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाने हैदराबाद संघाला २१३ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदरबाद संघाची फलंदाज अत्यंत खराब दिसून आली. ज्यामुळे त्यांचा संघ १३४ धावांवरच गारद झाला. हैदराबादच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करत आली नाही. त्यामुळे या विजयाच्या जोरावर चेन्नईने प्लेऑफच्या शर्यतीत पुन्हा मुसंडी मारली आहे.

चेन्नईने हैदराबादविरुद्धच्या विजयासह गुणतालिकेत तीन स्थानांची मोठी झेप घेतली आणि पाच विजयांसह १० गुणांसह गुणतालिकेत तिसरे स्थान गाठले आहे, तर हैदराबाद संघ सलग दोन पराभवांसह चौथ्या स्थानावर घसरला आहे. या सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि डॅरिल मिशेल यांच्या शानदार खेळीनंतर तुषार देशपांडेच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा ७८ धावांनी पराभव केला. गायकवाड आणि मिशेलच्या अर्धशतकांच्या जोरावर चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात २१२ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादची फलंदाजी अत्यंत खराब झाली आणि संपूर्ण संघ १८.५ षटकांत १३४ धावांत गारद झाला.

You may have missed