छत्रपती संभाजीनगर : डॉ. जीवन राजपूत यांनी घेतली वकील संघाच्या वकीलाची भेट

विविध स्तरातून मतदारांचा वाढता प्रतिसाद

प्रतिनिधी सुमित दंडुके / mcnnews

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यचा विकास आणि गोरगरिबांचे कल्याण हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून निवडणुक रिंगणात उतरलेले लोकप्रिय अपक्ष उमेदवार डॉ.जीवन राजपूत यांच्या प्रचाराने जोर धरला आहे. त्यांनी व्यापारी, उद्योजक,डॉक्टर, वकील यांच्या गाठीभेटी भर दिला असून वकील संघाच्या पदाधिकाऱी व वकीलांची भेट घेतली.डॉ. राजपूत यांना सर्व स्तरातून वाढता प्रतिसाद मिळत आहे.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय अपक्ष उमेदवार डॉ जीवन राजपूत यांनी आज सोमवार शहरात विविध ठिकाणी भेटी दिल्या त्यात सिडको परिसरातील श्री कालभैरवनाथ मंदिरास तसेच रेणुका माता मंदिरात जाऊन दर्शन घेतले . भक्तीनगर येथील श्री संत गोरोबा काका पुण्यतिथीनिमित्त आयोजित ह.भ.प. प्रदीप महाराज ( आळंदी) यांच्या सुश्राव्य किर्तनाला हजेरी लावली.त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयातील जिल्हा वकील संघाच्या कार्यालयास भेट घेऊन पदाधिकारी व अनेक वकील बांधवांची भेट घेऊन टीव्ही रिमोट या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन केले.

You may have missed