अल्लाह पाणी दे, मेघ दे. रामा पाणी दे मेघ दे, म्हणण्याची शहर आणि जिल्हा वासियावर वेळ…
प्रतिनिधी अन्वरअलमनूरजाफर /mcnnews
मराठवाड्याला अनेक प्रश्नाने ग्रासले आहे. त्यापैकी महत्वाचा प्रश्न सध्या जायकवाडी धरणात केवळ 8 टक्के पाणीसाठा शिल्लक असून मराठवाडयातील धरणांनी तळ गाठायला सुरूवात केली आहे. विभागातील 877 प्रकल्पांमध्ये केवळ 14.33 टक्केच पाणीसाठा शिल्लक असून मराठवाड्यात भीषण पाणी बाणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
मराठवाडयात गेल्या वर्षीही समाधानकारक पाऊस झालेला नाही. मात्र 2023 वर्षात मान्सूनचे उशिराने आगमन झाले. जून ते सप्टेंबर 2023 या मान्सूनच्या काळात सरासरी 84.55 टक्के म्हणजे 675.43 पावसाची नोंद झाली. मान्सूनमध्ये 15.45 टक्केची घट झाली. दरम्यान मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणांनेही तळ गाठायला सुरुवात केली असून, आज नाथसागरात केवळ 14.33 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच विभागातील येलदरीसह सिध्देश्वर आणि माजलगाव, माजंरा, आणि धाराशिव जिल्ह्यातील सीने – कोळेगाव ही मोठी धरणे कोरडीच आहेत. उन्हाचा पारा वाढायला सुरुवात झाली असून ऐन उन्हाळ्यात मराठवाड्यातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे.
कमी पर्जन्यमानामुळे मराठवाड्यातील पाणीसाठे अटत चालले असून परिणामी टँकरच्या संख्येत वाढ होत आहे. सध्यास्थितीत मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ 17.30 टक्के पाणीसाठा शिल्लक असून 3 मे रोजीच्या गोषवार्यानुसार 75 मध्यम प्रकल्पांत 7.12 टक्के; तर 749 लघुप्रकल्पांत 8.19 टक्केच पाणीसाठा आहे. तसेच गोदावरी नदीवरील 15 प्रकल्पवजा बंधार्यांमध्ये 20.22 टक्के, तर तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील 27 बंधार्यांमध्ये 7.315 टक्के पाणीसाठा आहे.मध्यम प्रकल्पांत केवळ 10 टक्के साठा मराठवाड्यातील 75 मध्यम प्रकल्पांत केवळ 7 टक्केच पाणीसाठा शिल्लक असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 16 प्रकल्पात केवळ 4 टक्के पाणीसाठा शिल्लक असून जालना येथील 7 प्रकल्पात 3 टक्के, बीडमधील 16 प्रकल्पात 14 टक्के, लातूर 8 प्रकल्पात 5 टक्के, धाराशिव मधील 17 प्रकल्पात केवळ 1 टक्के, नांदेड जिल्ह्यातील 9 प्रकल्पात 19 टक्के पाणीसाठा शिल्लक असून परभणीतील 2 मध्यम प्रकल्पात पाणीसाठा नसल्याचे समोर आले आहे.
मराठवाड्यातील धरणांची स्थिती…
धरण स्थिती (टक्क्यांमध्ये)
जायकवाडी 8
येलदरी 30
सिद्धेश्वर 02
मांजलगाव 00
मांजरा 03
उर्ध्व पेनगंगा 41
निम्न तेरणा 00
निम्न मनार 27
विष्णुपुरी 30
निम्न दुधना 03
सिना कोळेगाव 00
More Stories
मालवण(Malvan):जयदीप आपटेचे वकील सिंधुदुर्गात दाखल, स्ट्रॅटेजी तयार, जामीन मिळवण्यासाठी पडद्यामागे हालचाली? जयंत पाटलांचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar):आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध; ठाकरे गट-भाजप आमनेसामने, रामा हॉटेलबाहेर तुफान राडा
Bangladesh Violence:कधीकाळी अख्खं कुटुंब संपलं, पण शेख हसीना थोडक्यात बचावल्या, भारतानं दिलेला आश्रय; इंदिरा गांधींसोबत खास कनेक्शन