खासदार इम्तियाज जलीलची बाजार सावंगी येथे प्रचारसभा संपन्न…
सध्या सर्वत्र लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्व उमेदवार प्रचारासाठी रात्र दिवस जोमाने काम करत आहे. एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांची देखील प्रचार सभा सुरु झाली असून त्यांनी बाजार सावंगी येथे काल प्रचार सभा घेतली .
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व मतदारांनी पुन्हा संधी देऊन जातीपातीच्या राजकारणास मुठमाती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन एमआयएम चे खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी बाजार सावंगी येथील प्रचारसभेत बोलताना केले बाजार सावंगी परीसरातील देवळाना, सुल्तानपुर,बोडखा , पाडळी या गावात प्रचार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या निवडणुकीत विरोधकांकडे विकासाची कुठलीही योजना नसुन यासाठी त्यांनी जातीपातीचे राजकारण सुरू केले आहे मागील पाच वर्षांत जिल्ह्यातील विविध विकास कामे खेचुन आणली असून आता यापुढील विकासासाठी मतदारांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले याप्रसंगी बाळकृष्ण लोंढे, शिवाजी काटकर,अकिल आतार ,श्रीनिवास गुळवे, खतिब शहा, युसुफ पटेल तसेच परीसरातील मतदारांची उपस्थिती होती