छत्रपती संभाजीनगर : आधी नोटा दाखवल्या मग बाटली दाखवत अंबादास दानवेंची प्रश्नांची सरबत्ती, संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर
By:प्रतिनिधी सुमित दंडुके / mcnnews
छत्रपती संभाजीनगर :आज लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीने रॅली काढली होती. यावेळी दोन्ही गट आमनेसामने आल्यानंतर क्रांतीचौकात दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. मात्र थोडक्यात हे प्रकरण निवळले. यावेळी अंबादास दानवे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना 200 ची नोट दाखवली तर शिवसेनेच्या लोकाना बाटली दाखविल्याने वातावरण काही काळ चिघळले होते.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना मनसेचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. यावेळी दोन्ही बाजूंनी घोषणा देण्यात आल्या.
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) चौथ्या टप्प्याच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) लोकसभेच्या रिंगणात आहेत.प्रचाराच्या शेवटच्या दिवसाच्या निमित्तानं रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. महायुती आणि शिवसेना ठाकरे गटाचे शिवसैनिक क्रांती चौकात आमने सामने आल्यानं तणावं वातावरण पाहायला मिळालं. अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दोनशे रुपये देऊ केले होते.याठिकाणी दोन्ही बाजूनं घोषणाबाजी करण्यात आली होती.
क्रांती चौकात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हातात दारुची बाटली धरुन विरोधकांवर हल्लाबोल केला. महायुती आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेंकांवर धावून जाताना पाहायला मिळाले. अंबादास दानवे यांनी हातात नोटा धरुन मनसेला डिवचलं. यावर मनसेकडून देखील उत्तर देण्यात आलं.
शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पन्नास खोके आणि एकदम ओके अशा घोषणा दिल्या. अंबादास दानवे यांनी भुमरे यांचा व्यवसाय दारुचा आहे त्यामुळं दारुची बाटली दाखवतोय, असं म्हटलं. पैठणची दारु संभाजीनगरमध्ये आणायची का असा सवाल दानवे यांनी केला. तणाव योग्य नाही पण आमच्या कार्यकर्त्यावर हात उचलला तर आम्ही देखील उत्तर देऊ असं अंबादास दानवे म्हणाले. संदिपान भुमरे यांचा व्यवसाय दारु असल्याचं लोकांना सांगतोय, असं अंबादास दानवे म्हणाले. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना थांबवू ,असं अंबादास दानवे म्हणाले. तर, ठाकरे गटाकडे कार्यकर्ते नसल्यानं असा प्रकार करण्यात आला, असं आमदार संजय शिरसाट म्हणाले.
पहा विडिओ :
More Stories
छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar):आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध; ठाकरे गट-भाजप आमनेसामने, रामा हॉटेलबाहेर तुफान राडा
जालना(Jalna):मनोज जरांगेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी; उपोषणाचा पाचवा दिवस, अडचणी वाढल्या!
मराठा आरक्षण (Maratha Reservation):मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आंतरवाली सराटीतील उपोषण स्थगित करणार, कारणही सांगितलं, म्हणाले….!