ज्यातील प्रमुख लढतींपैकी एक असलेल्या बीड लोकसभा (Beed Loksabha) निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडेंसाठी (Pankaja Munde) प्रतिष्ठेची निवडणूक असेलल्या या मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पाहायला मिळत आहे. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती, एका पक्षाविरुद्ध दुसरा पक्ष अशी निवडणूक होत आहे. मात्र, बीड लोकसभा मतदारसंघ याला अपवाद आहे. कारण, बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी पारंपारिक लढत यावेळी असून मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यामुळे यंदा ही लढाई टोकाला पोहोचल्याचं दिसून येत आहे. पंकजा मुंडेंना बीडमधून बजरंग सोनवणे यांचं म्हणजे मराठा उमेदवाराचं आव्हान आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीचा बीड हा केंद्रबिंदू असल्याने यंदा येथील निवडणुकीला जातीय रंग लागल्याचे दिसत आहे.
More Stories
devendra fadnavis:फडणवीसांचा राजीनामा घेणार का ?
GALLI TE DELHI SHOW | देशाचा मुड काय….?
GALLI TE DILLI SHOW- मुंबईत कोण तरणार कोण हरणार…. ?