Galli te dilli : राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये 57.49 टक्के इतके मतदान झालं आहे. त्यामध्ये सर्वाधिक मतदान हे जालना लोकसभेमध्ये झालं. जालन्यामध्ये 68.30 टक्के मतदान झालं. तर पुण्यात सर्वात कमी म्हणजे 49.43 टक्के मतदान झालं. राज्यातील दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण 62 टक्के मतदान झालं होतं. त्या तुलनेत तिसऱ्या टप्प्यातील मतदानामध्ये जवळपास साडे चार टक्क्यांची घट झाल्याचं दिसतंय.
जालन्यामध्ये भाजपचे रावसाहेब दानवे विरुद्ध काँग्रेसचे कल्याणराव काळे अशी लढत आहे. तर पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे यांच्यात लढत आहे.
राज्यातील आतापर्यंतचे मतदान
राज्यात – 57.49 टक्के मतदान
- अहमदनगर- 55.76 टक्के
- औरंगाबाद – 60.73 टक्के
- बीड – 62.15 टक्के
- जळगाव- 53.65 टक्के
- जालना – 68.30 टक्के
- मावळ – 54.90 टक्के
- नंदुरबार – 61.26 टक्के
- पुणे – 49.43 टक्के
- रावेर – 61.36 टक्के
- शिर्डी – 59.01 टक्के
- शिरूर- 51.46 टक्के
दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख लढती कोणत्या?
1. जालन्यात रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काँग्रेसचे कल्याण काळे.
2. शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील
3. मावळमध्ये श्रीरंग बारणे यांच्या विरोधात ठाकरे गटाचे संजय वाघेरे.
4. अहमदनगर दक्षिणमध्ये सुजय विखे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे निलेश लंके.
5. शिर्डीत सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात भाऊसाहेब वाघचौरे आणि वंचितच्या उत्कर्षा रुपवते.
6. रावेरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या श्रीराम पाटील यांचं रक्षा खडसेंना आव्हान असेल.
7. नंदूरबारमध्ये हिना गावित यांच्या समोर काँग्रेसच्या गोवाल पाडवी.
8. छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या विरोधात शिवसेनेकडून संदिपान भुमरे, ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे.
9. पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आणि वंचितकडून वसंत मोरे लोकसभेच्या रिंगणात आहेत.
10. जळगावात भाजपच्या स्मिता वाघ आणि ठाकरे गटाच्या करण पवार.
11. बीडमध्ये पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनवणे यांच्यात लढत होत आहे.
More Stories
रुपाली चाकणकर(Rupali Chakankar on Supriya Sule):सुप्रिया सुळेंनी 2 कोटी 40 लाख महिलांची माफी मागावी, रुपाली चाकणकरांचा हल्लाबोल, म्हणाल्या बदला घ्यायचा असेल तर तुतारीला मतदान करु नका
राज ठाकरे(Raj Thackeray):’पुतळे ही केवळ राजकीय सोय’, महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरुन राज ठाकरे संतापले!
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Issue : ”फोटो काढून जाहिरातबाजी करून जनतेला गंडा घालणारे पोकळ नेते…”; शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर अभिनेत्याची पोस्ट चर्चेत