May 5, 2025

galli te dilli: लातूर ते रायगड महायुतीची पडझड ! महाराष्ट्र लोकसभा निवडणूक ३रा टप्पा

रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यांतील वरसई येथील गावकऱ्यांनी बाळगंगा धरण प्रकल्पाबाबत सरकारकडे योग्य मोबदला मिळण्यासाठी वारंवार प्रयत्न केला. मात्र, गावकऱ्यांच्या या मागण्यांना सरकारकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर गावकऱ्यांनी आज पार पडणाऱ्या निवडणुकीवर  बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. आज सर्वत्र होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीवर या बहिष्काराचे पडसाद उमटताना दिसत आहेत. सकाळपासुन गावातली केवळ एका व्यक्तीने मतदान केलं असून वरसईसह ईतर सहा गावातील एकाही गावकऱ्यांनं मतदान केंद्रांकडे फिरकूनही पाहिले नाही. त्यामुळे रायगड लोकसभेवर जवळजवळ 10 हजार मतांचा फरक पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.लातूरच्या सांगवी सुनेगाव या गावात शून्य टक्के मतदान

लातूर जिल्ह्यातील सांगवी सुनेगाव या गावात आतापर्यंत एकाही नागरिकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावला नाहीये. गेल्या कित्येक वर्षांपासून गावातील प्रलंबित मागण्यांसाठी पाठपुरावा करूनही मागणी पूर्ण न झाल्याने गावकऱ्यांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे. परिणामी आता पर्यंत या मतदानकेंद्रावर  शून्य टक्के मतदान झाले आहे.लातूर नांदेड हायवे वर कट पॉईंट देण्यात यावा या मागणीसाठी गावातील गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्काराचे शस्त्र उगारले आहे. सांगवी सुनेगाव येथील ग्रामस्थांची मागील अनेक दिवसापासून हायवेला कट पॉईंट मिळण्याची मागणी होती. मात्र प्रशासन काही केल्या ती पूर्ण करत नसल्याने संतप्त गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत या मतदानकेंद्रांवर गावातील एकही नागरिक या मतदान केंद्रांवर फिरकला नाहीये. या गावात 477 मतदार असून या सर्व मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

ह्या विषयावरच पहा आमचा खास शो गल्ली ते दिल्ली

You may have missed