भारताचा टी-20 – २०२४ विश्वचषक संघ जाहीर

चहल, सॅमसन, पंत यांचा भारताच्या टी-20 विश्वचषक संघात समावेश तर के एल राहुल चा पत्ता कट हार्दिक पांड्या उपकर्णधार

 

 

टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर झाला. अहमदाबादमध्ये बैठकीनंतर संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाच्या १५ सदस्यांचा संघ जाहीर झाला. यामध्ये ऋषभ पंतचं पुनरागमन झालं आहे. तर केएल राहुलला मोठा धक्का बसला असून त्याला टी२० वर्ल्ड कप संघातून वगळण्यात आलं आहे. ऋषभ पंतसोबत शिवम दुबे, संजू सॅमसन आणि युझवेंद्र चहल यांचं पुनरागमन झालं आहे.

टी 20 वर्ल्ड कप चे आयोजन वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे. १ जून ते २९ जून या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारताने १५ खेळाडूंचा संघ जाहीर केला असून त्यात ४ खेळाडू स्टँडबायवर ठेवण्यात आले आहेत. यात शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान यांचा समावेश आहे.

टी-20 विश्वचषक २०२४ साठी भारताचा संघ:

रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

 

You may have missed