विराट कोहली आणि फाफ डूप्सेसी यांच्या तडाखेबाज फलंदाजीच्या जोरावर शनिवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या घरच्या मैदानावर गुजरात टायटन्सचा पराभव केला.
IPL 2024 : विराट कोहली आणि फाफ डूप्सेसी याच्या तडाखेबाज फलंदाजीच्या जोरावर शनिवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या घरच्या मैदानावर गुजरात टायटन्सचा पराभव केला. हा या आयपीएल हंगामामधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा चौथा विजय आहे. या विजयासोबतच आरसीबी 11 सामन्यात चार विजयासह आठ अंक घेऊन पॉइंट टेबलमध्ये दहाव्या स्थानावरून सातव्या स्थानावर पोहोचली आहे. आरसीबीने गुजरात टायटन्सचा पराभव केल्यानंतर आयपीएलचं प्लेऑफ समीकरण आणखी रंजक बनलं आहे. आतापर्यंत कोणतीही टीम अधिकृतरित्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेली नाहीये. आरसीबीचे लीग स्टेजचे आणखी तीन सामने बाकी आहेत. जर आरसीबी हे तीनही सामने जिंकले तर संघ 14 पॉइंट्स मिळवून चौथ्या क्रमांकासाठी दावा ठोकू शकतो. मात्र हे सामने त्यांना मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. तसेच त्यांना प्लेऑफसाठी इतर काही टीमच्या निकालावर देखील अवलंबून राहावं लागणार आहे.
गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना आरसीबीपुढे अवघ्या 148 धावांचं सोपं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उरलेल्या आरसीबीनं 13.4 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात हा सामाना खिशात घातला. गुजरातवर मोठा विजय मिळवला. कर्णधार फाफ डुप्लेसी आणि विराट कोहली यांनी आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 5.5 षटकात 92 धावांची तडाखेबंद फलंदाजी केली. डुप्लेसीने 23 चेंडूमध्ये 10 चौके आणि तीन षटकांच्या मदतीनं 64 धावा बनवल्या.
तर दुसरीकडे प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या गुजरात टायटन्स या सामन्यात शेवटपर्यंत सूर गवसला नाही. जीटीचे खेळाडू अवघ्या 147 धावा करून तंबूत परतले. त्यामुळे आरसीबीपुढे एक सोप लक्ष्य होतं. जे आरसीबीने विराट कोहली आणि फाफ डूप्सेसी यांच्या फलंदाजीच्या जोरावर चार गडी गमावत अवघ्या 13.4 षटकांत पार केलं.
More Stories
vinesh phogat disqualified: विनेश फोगाटचं वजन कसं वाढलं, वजनाकडे कसं दुर्लक्ष झालं? चूक कोणाची?
आयपीएल(IPL 2025): T20 वर्ल्ड कप गाजवणारा भारताचा सुपरस्टार होणार पंजाब किंग्जचा कोच?
James Anderson Record:40 हजारांहून अधिक चेंडूंचा मारा, 800 किमीचा रनअप; जेम्स अँडरसनने रचला भीमपराक्रम!