Punjab Kings New Coach : पंजाबचं मॅनेजमेंट यंदा भारतीय कोचच्या शोधात असून त्या शर्यतीमध्ये टीम इंडियाच्या वर्ल्ड कप हिरोचं नावं सर्वात आघाडीवर आहे.
आयपीएल(IPL 2025): आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या सिझनपासून खेळणारी आणि एकदाही विजेतेपद न जिंकणाऱ्या टीममध्ये पंजाब किंग्जचा समावेश आहे. पंजाबनं आजवर खेळाडू, कॅप्टन, कोच इतकंच काय तर टीमचं नावंही बदललं. त्यानंतरही त्यांच्या कामगिरीत फरक पडला नाही. आयपीएल 2014 नंतर एकदाही या टीमला प्ले ऑफ मध्ये प्रवेश करता आलेला नाही. पंजाबच्या टीम मॅनेजमेंटनं नव्या सिझनची तयारी सुरु केली आहे. पंजाबचं मॅनेजमेंट यंदा भारतीय कोचच्या शोधात असून त्या शर्यतीमध्ये टीम इंडियाच्या वर्ल्ड कप हिरोचं नावं सर्वात आघाडीवर आहे
या विषयावर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार पंजाब किंग्जचा(IPL 2025) कोच म्हणून युवराज सिंहचं नाव आघाडीवर आहे. युवराजनं टीम इंडियाला अनेक ऐतिहासिक सामन्यात संस्मरणीय विजय मिळवून दिला आहे. 2007 साली झालेला पहिला-वाहिला टी20 वर्ल्ड कप तसंच 2011 मध्ये झालेल्या वन-डे वर्ल्ड कपच्या विजेतेपदामध्ये युवराजचं महत्त्वाचं योगदान होतं.
युवराज सिंह कोच झाल्यास त्याचा पंजाब किंग्जला मोठा फायदा होईल. त्याची क्रिकेटची समज आणि मोठ्या अनुभवाचा टीमला नक्की होईल. त्याचबरोबर युवराज पंजाबचाच(IPL 2025) असल्यानं त्याला स्थानिक क्रिकेटची चांगली माहिती आहे. याबाबत अधिकृत घोषणेची सध्या प्रतीक्षा आहे. पण, युवराज कोच होणार या बातमीनं टीमचे फॅन्स चांगलेच उत्साहात आहेत.
सुरुवातीचं करिअर
युवराज आयपीएलच्या पहिल्या सिझनमध्ये (2008) किंग्ज XI पंजाबचा (IPL 2025)कॅप्टन होता. त्याच्या कॅप्टनसीमध्ये टीम सेमी फायनलपर्यंत पोहोचली होती. त्या सिझनमध्ये युवराजनं कॅप्टनसीसह बॅटिंग आणि बॉलिंगमध्येही योगदान दिलं होतं.
युवराजनं किंग्ज इलेव्हन पंजाबकडून (IPL 2025)खेळताना 29 मॅचमध्ये जवळपास 600 रन केले होते. तसंच 10 पेक्षा जास्त विकेट्सही घेतल्या आहेत. टीम इंडियाचाही दिग्गज खेळाडू म्हणून ओळखला जाणारा युवराज पंजाब किंग्जचा हेड कोच झाला तर त्याचा टीमला नक्कीच फायदा होईल.
More Stories
vinesh phogat disqualified: विनेश फोगाटचं वजन कसं वाढलं, वजनाकडे कसं दुर्लक्ष झालं? चूक कोणाची?
James Anderson Record:40 हजारांहून अधिक चेंडूंचा मारा, 800 किमीचा रनअप; जेम्स अँडरसनने रचला भीमपराक्रम!
गौतम गंभीर(Gautam Gambhir): द्रविडनं विजेतेपद मिळवून दिलं, नवा हेड कोच गंभीरसमोर आहेत 5 मोठी आव्हानं!