जालना लोकसभा मतदार संघ 1 नंबरची सीट विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार – रावसाहेब दानवे
भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचाराचा नारळ आज दि 30 रोजी फ़ुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज येथे फोडण्यात आला. यावेळी आलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले,तर माजी विधानसभा अध्यक्ष व आमदार हरिभाऊ बागडे यांनी विरोधकांवर निशाण साधत टोले लगावले, तर उमेदवार रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना गाफील राहू नका सर्वाना जोमाने कामाला लागा.
यावेळी देशात भाजपा 400 पार असेल तर आपण लोकसभा संघात 4 लाख पार असा आकडा दिसायला हवा विरोधक खोट्या अफवा पसरवत आहे,शोषल मीडियावर खोटे व्हिडीओ पसरवत असून वेळीच त्याचे खंडन करा असा सल्ला ही यावेळी दानवे यांनी कार्यकर्त्यांना दिला असून आपण विकासाच्या मुद्यांवर निवडणूक लढवत आहोत विरोधकांना बोलण्यासारखं काही नाही असे खडे बोल ही यावेळी सुनावले
रावसाहेब दानवे,माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे,माजी जालना लोकसभा प्रमुख विजय औताडे,जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ,तालुकाध्यक्ष सांडू आणा जाधव,माजी बांधकाम सभापती किशोर बलांडे,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राधाकिसन पठाडे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्रीराम शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पथरीकर,जितेंद्र जैस्वाल,जेष्ठ कार्यकर्त्या मंगलाताई वाहेगवकर,महिला तालुकाध्यक्ष सविता नवले,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अनुराधाताई चव्हाण,एशवऱ्या गाडेकर,सविता फुके,रमेश काटकर,राजेंद्र काळे,राऊफ कुरेशी,राहुल डकले,नामदेव कोलते,दादाराव वानखडे,अपासाहेब काकडे, सरपंच शिवाजी खरात,गोपाळ वाघ,राजेंद्र डकले, रोशन अवसरमल,फारुख शेख यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते व नागरिकच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.
More Stories
नवी दिल्ली(New Delhi):संसदेत आज अर्थसंकल्पावरुन घमासान, राहुल गांधी काय बोलणार?
केंद्रीय अर्थसंकल्प(Union Budget 2024):विधानसभा निवडणूक असूनही महाराष्ट्राला अर्थसंकल्पात काहीच का मिळालं नाही, भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाच्या कृतीचा नेमका अर्थ काय?
नवी दिल्ली(New Delhi): 23 जुलै रोजी सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प, 22 तारखेपासून अधिवेशनाला सुरुवात होणार