कल्याण हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो. त्याचा मुलगा श्रीकांत शिंदे हे या मतदार संघाचे खासदार आहेत. मात्र याच मतदार संघात आता शिवसेना शिंदे गटात नाराजी नाट्य रंगले आहे.
कल्याण(Kalyan):विधानसभा निवडणुका जसजश्या जवळ येत आहेत. तसे दावे-प्रतिदावे केले जात आहे. काही ठिकाणी नाराजी नाट्यही पाहायला मिळत आहेत. हीबाब राजकीय पक्षांसाठी मात्र डोकेदुखी ठरत आहे. कल्याण हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो. त्याचा मुलगा श्रीकांत शिंदे हे या मतदार संघाचे खासदार आहेत. मात्र याच मतदार संघात आता शिवसेना शिंदे गटात नाराजी नाट्य रंगले आहे. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर या नाराजीचा फटका बसतो की काय याची चर्चा सुरू झाली आहे.
अंबरनाथमध्ये पक्षात गटबाजी
अंबरनाथ शहरातील शिवसेनेची कार्यकारिणी अंतर्गत गटबाजी, हेवेदावे आणि लोकसभा निवडणुकीतील कामगिरी या पार्श्वभूमीवर बरखास्त करण्यात आली होती. यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथमध्ये नवीन कार्यकारणीच्या निवडीसाठी इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या. मात्र यावेळी शहरातील दोन पैकी एक गट मुलाखतींच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिला. त्यामुळे शहरातील गटबाजी कायम असल्याचं स्पष्ट झालं.
किणीकर विरूद्ध वाळेकर संघर्ष?
अंबरनाथ शहरातील शिवसेनेत मागील 10 ते 15 वर्षांपासून आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर असे दोन गट पडले आहेत. मागील 5 वर्षात तर या दोन गटातील शीतयुद्ध टोकाला गेलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण प्रचार यंत्रणा आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आली. इतकंच नव्हे, तर इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेच्या शहर शाखेऐवजी बाजूलाच घेतलेल्या नवीन कार्यालयातून निवडणूक प्रचार करण्यात आला होता. यामुळे ही नाराजी अधिकच वाढली होती.
गटबाजीचा बसला फटका
अंबरनाथ शहरात कल्याण लोकसभेतील सर्वाधिक मोठी आणि सर्वात जास्त विकासकामं करूनही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना अपेक्षित मताधिक्य मिळू शकलं नव्हतं. याचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीतही शहरप्रमुखांचा फोटो आमदार गटाने डावलल्याने पुन्हा एकदा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही नाराजी व्यक्त करत या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार अंबरनाथ शहराची शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली.
गटबाजीचे झाले प्रदर्शन
गुरुवारी अंबरनाथमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नवीन कार्यकारणीत काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांच्या स्वतः मुलाखती घेतल्या. मात्र या मुलाखतींच्या कार्यक्रमाला शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यासह त्यांचा संपूर्ण गट अनुपस्थित राहिला. तर नुकतेच काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले नेते प्रदीप पाटील आणि त्यांचे कार्यकर्तेही या बैठकीला अनुपस्थित राहिले. त्यामुळे फक्त एकाच गटातून संपूर्ण शहराची पदं निवडली जाणार का? आणि पक्षात असलेली ही गटबाजी कमी होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांना विचारलं असता त्यांनी मात्र गटबाजी हा तुम्हीच लावलेला शोध असून पक्षात गटबाजी नसल्याचं सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
More Stories
रुपाली चाकणकर(Rupali Chakankar on Supriya Sule):सुप्रिया सुळेंनी 2 कोटी 40 लाख महिलांची माफी मागावी, रुपाली चाकणकरांचा हल्लाबोल, म्हणाल्या बदला घ्यायचा असेल तर तुतारीला मतदान करु नका
मुंबई (Maharashtra Assembly Elections 2024): मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
राज ठाकरे(Raj Thackeray):’पुतळे ही केवळ राजकीय सोय’, महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरुन राज ठाकरे संतापले!