अमेरिकेकडून सुरु असलेले प्रकार म्हणजे भारताच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करणे आहे.
Lok Sabha Election 2024 : भारतात लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. निवडणुकीचे तीन टप्पे झाले आहेत. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी येणार आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. आता या निवडणुकीसंदर्भात रशियाने मोठा दावा केला आहे. अमेरिका भारताच्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा रशियाने केला आहे. लोकसभा निवडणूक दरम्यान भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे, असे रशियाने म्हटले आहे.
मारिया झाखारोवा यांनी म्हटले की, अमेरिकेकडून सुरु असलेले प्रकार म्हणजे भारताच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करणे आहे. हा प्रकार म्हणजे भारताचा अवमान करणे आहे. अमेरिका सातत्याने भारतावर खोटे आरोप करत आहेत. त्यांना भारताच्या इतिहास माहीत नसल्यामुळे ते असे आरोप करत आहे.
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव यांनी खलिस्तानी अतिरेकी गुरपतवंत सिंह पन्नू याच्याबाबत वक्तव्य केले आहे. पन्नू याच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या भारतावर होत असलेल्या आरोपाबाबत त्या म्हणाले की, या प्रकरणात भारतीय नागरिकांच्या सहभागाबाबत अमेरिकेने अद्याप कोणताही ठोस पुरावा दिलेला नाही. पुराव्याअभावी असे आरोप करणे चुकीचे आहे.
More Stories
नवी दिल्ली(New Delhi):संसदेत आज अर्थसंकल्पावरुन घमासान, राहुल गांधी काय बोलणार?
केंद्रीय अर्थसंकल्प(Union Budget 2024):विधानसभा निवडणूक असूनही महाराष्ट्राला अर्थसंकल्पात काहीच का मिळालं नाही, भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाच्या कृतीचा नेमका अर्थ काय?
नवी दिल्ली(New Delhi): 23 जुलै रोजी सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प, 22 तारखेपासून अधिवेशनाला सुरुवात होणार